‘पब्लिक पंचनामा’ इफेक्ट! अखेर जनगणना कर्मचाऱ्यांच्या खात्यात मानधन जमा

‘पब्लिक पंचनामा’ इफेक्ट! अखेर जनगणना कर्मचाऱ्यांच्या खात्यात मानधन जमा



८ ऑक्टोबरला मूल नगर परिषदेची कार्यवाही; अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शिक्षकांना दिलासा

मूल | प्रतिनिधी

जनगणनेचे काम पूर्ण, मात्र मानधनाची प्रतीक्षा कायम! या मुद्द्यावर ‘पब्लिक पंचनामा’ने आवाज उठविल्यानंतर अखेर ८ ऑक्टोबर रोजी मूल नगर परिषदेने संबंधित शिक्षकांच्या बँक खात्यात मानधनाची रक्कम जमा केली. त्यामुळे अनेक दिवसांपासून मानधनाच्या प्रतीक्षेत असलेल्या शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.

WhatsApp ग्रुपवरील सवालांची चर्चा; अखेर खात्यात रक्कम जमा!

जनगणनेच्या कामासाठी तयार करण्यात आलेल्या WhatsApp ग्रुपवर मानधनाबाबत सातत्याने विचारणा केली जात होती. “Mandhan update please!”, “केव्हा मिळणार सर मानधन?”, “आम्ही किती दिवस वाट बघायची?” आणि “मूल नगरपालिकेला पुढच्या वर्षी मानधन घ्यायचं आहे का?” अशा प्रश्नांतून कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा आणि नाराजी समोर आली होती.

इतर तालुक्यांमध्ये मानधन मिळाल्याची चर्चा होत असताना मूल नगर परिषद क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मात्र मानधनासाठी वाट पाहावी लागत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता.

बातमीची दखल; कर्मचाऱ्यांना दिलासा

जनगणनेचे राष्ट्रीय कार्य पूर्ण करणाऱ्या शिक्षकांना मानधनासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचा प्रश्न ‘पब्लिक पंचनामा’ने ठळकपणे मांडला. त्यानंतर ८ ऑक्टोबर रोजी नगर परिषदेने संबंधित शिक्षकांच्या खात्यात मानधनाची रक्कम जमा केली.

या घडामोडीमुळे मानधनाचा प्रश्न मार्गी लागल्याचे चित्र असून, कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

‘पब्लिक पंचनामा इफेक्ट’ची चर्चा!

जनतेचे आणि कर्मचाऱ्यांचे प्रश्न मांडणे, प्रशासनाचे लक्ष वेधणे आणि संबंधित विषयांना वाचा फोडणे ही पत्रकारितेची महत्त्वाची भूमिका आहे. जनगणना कर्मचाऱ्यांच्या मानधनाचा मुद्दाही त्याच पद्धतीने समोर आणण्यात आला.

अखेर मानधन खात्यात जमा झाल्याने प्रतीक्षेला पूर्णविराम मिळाला. या घडामोडीला ‘पब्लिक पंचनामा इफेक्ट’ म्हणून पाहिले जात आहे.

जनगणनेचे काम पूर्ण करणाऱ्या शिक्षकांना मानधन मिळाल्याने समाधान व्यक्त केले अजून पब्लिक पंचनामाचे आभार मानले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!