अपघातात मुलाचा मृत्यू - चकपीरंजी येथील वाटगुरे कुटुंबात शोककळा

 


अपघातात मुलाचा मृत्यू - चकपीरंजी येथील वाटगुरे कुटुंबात शोककळा

सावली - सावली तालुक्यातील चकपीरंजी गावात राष्ट्रीय महामार्ग पार करतांना झालेल्या अपघातात कु. आर्यन पुंडलिक वाडगुरे याचा मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे.

       गडचिरोली - चंद्रपूर महामार्ग चकपीरंजी गावातून जात असल्याने अनेकदा अपघाताच्या घटना घडल्या आहेत. पुंडलिक वाटगुरे यांचा पहिल्या वर्गात शिकणारा लहान मुलगा आर्यन हा महामार्ग ओलांडण्यासाठी धावत गेला मात्र अचानक चंद्रपूरकडून कार येत असल्याचे लक्षात न आल्याने कारने धडक दिली. लगेच गडचिरोली येथे उपचारासाठी भरती करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आर्यनचा मृत्यू झाल्याने वाटगुरे परिवारात व चकपीरंजी गावात शोककळा पसरली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!