शेतकऱ्यांना 24 तास वीज द्या मोतीलाल टहलीयानी यांची मुनगंटीवार यांच्याकडे मागणी
शेतकऱ्यांना २४ तास वीजपुरवठा करा
धान पीक वाचविण्यासाठी धडपड
भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते मोतीलाल टहलियानी यांची आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या कडे मागणी
मूल : मूल तालुक्यात सध्या पावसातील खंड आणि उष्णतेमुळे शेतीपिकांवर संकट निर्माण झाले असून धान पिकाला सिंचनाची नितांत गरज आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना चोवीस तास अखंड व सुरळीत वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी येथील भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते मोतीलाल टहलियानी यांनी क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या कडे केली आहे. मुख्य म्हणजे मूल तालुका दुष्काळ ग्रस्त घोषित करण्यात आलेला आहे.
पावसाने दडी मारल्याने अनेक शेतांमध्ये जमिनीतील ओलावा कमी झाला आहे. धान पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना कृषीपंपाच्या माध्यमातून पाणी द्यावे लागत आहे. मात्र, वीजपुरवठ्याचे मर्यादित तास आणि वारंवार होणारे खंड यामुळे सिंचनाचे नियोजन विस्कळीत होत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे.
धान उत्पादक क्षेत्रात कॄषी पंपांना खरीप हंगाम संपेपर्यंत विशेष बाब म्हणून २४ तास वीजपुरवठा देण्याची मागणी यापूर्वीही आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी शासनाकडे केली आहे. परंतु महावितरण कंपनी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.
“धानाचे पीक हातातून जाऊ नये, यासाठी सध्या सिंचनाला प्राधान्य देणे आवश्यक आहे. महावितरणने शेतकऱ्यांना २४ तास वीजपुरवठा करून सहकार्य करावे,” अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
वीजपुरवठा सुरळीत झाल्यास शेतकऱ्यांना वेळेवर पाणी देता येईल आणि संकटात सापडलेले धान पीक वाचविण्यास मदत होईल. यासाठी येथील भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते मोतीलाल टहलियानी यांनी क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या कडे मागणी केली आहे. संकटात सापडलेल्या शेतकरी वर्गाला दिलासा मिळावा अशी मागणी होत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!