ब्रेकिंग न्यूज.. मुल येथे कारचा भीषण अपघात
मुल - मुल - नागपूर मार्गांवर भोपाल गॅरेजवळ कारचा अपघात झाल्याने मंगेश रोडे या तरुणाचा मृत्यू झाला असून ३ व्यक्ती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.
मध्यरात्री अती वेगाने जाणाऱ्या कारचा अपघात मुल जवळील भोपाल गॅरेज जवळ झाला. कार थेट शेतात घुसल्याने अनेकदा पलटी मारल्याचे दिसते. त्यात ४ व्यक्ती प्रवास करीत असतांना एकाचा मृत्यू झाला असून ३ व्यक्ती गंभीर जखमी झाल्याचे कळते. जखमीना चंद्रपूर रुग्णालयात हलविले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!