महाराजा धानाचे वाण कमी कालावधीचे निघाल्याने शेतकरी चिंतेत - कंपनीकडून फसवणूक झाल्याचा आरोप
महाराजा धानाचे वाण कमी कालावधीचे निघाल्याने शेतकरी चिंतेत - कंपनीकडून फसवणूक झाल्याचा आरोप
सावली : सावली तालुक्यातील खेडी येथील शेतकऱ्यांनी सोनम सिड्स कंपनीकडून ‘महाराजा’ धानाचे वाण खरेदी केले मात्र कमी कालावधीचे निघाल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. सदर वाणाचा कालावधी १४० ते १४५ दिवसांचा असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात हे पीक ११० ते १२० दिवसांतच निघट असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
खेडी येथील शेतकऱ्यांनी सावली येथील कृषी केंद्रातून या वाणाचे बियाणे खरेदी करून सुमारे ५० एकर क्षेत्रात पेरणी केली. मात्र, अपेक्षेपेक्षा कमी कालावधीत धान तयार झाल्याने शेतकऱ्यांसमोर नवीन समस्या निर्माण झाली आहे. या परिसरात गोसेखुर्दचे पाणी मुबलक मिळत असून शेतजमिनींमध्ये पाणी साचून राहत असल्याने दीर्घ कालावधीच्या धान वाणाची लागवड करण्यात येते. महाराजा धान जास्त कालावधी व उत्पन्नासाठी चांगला असल्याने शेतकरी या धानाच्या वानाची मागणी करतात. मात्र यावेळी ‘महाराजा’ वाण अपेक्षेपेक्षा लवकर निघाल्याने पिकाच्या वाढीवर आणि अपेक्षित उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे आधीच शेतकरी अडचणीत असताना बियाण्याच्या कालावधीबाबत निर्माण झालेल्या या प्रकारामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
संबंधित कृषी केंद्रमार्फत कंपनीला याबाबत अवगत केले आहे मात्र कपंनीचे प्रतिनिधी पाहणीसाठी आलेले नाही. संबंधित बियाण्याची कृषी विभागामार्फत तपासणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी फसवणूक करणाऱ्या कंपनीकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी नागा ओगुवार, संजय मर्लावार, दयाराम भोयर, रामदास मर्लावार, बिरा मर्लावार, दिवाकर पाडेवार, शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
🌾 शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी करावे
सावली तालुक्यात जास्त कालावधीचे धानाचे पीक घेतले जात असतांना सिड्स कपंनीने कमी कालावधीचे धान वाण देऊन फसवणूक केली आहे. तालुक्यात शेकडो शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा अंदाज आहे. तरी फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी करावे.
विजय कोरेवार
माजी सभापती पं. स. सावली



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!