दोन वाघाच्या लढाईत एकाचे मृत्यु, उत्तर ब्रह्मपुरी वन परिक्षेत्रातील घटना.
यश कायरकर:
ब्रह्मपुरी वन विभाग ब्रह्मपुरी अंतर्गत येणाऱ्या उत्तर ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रातील, मेंडकी उप क्षेत्र आणि चिचखेडा नियत क्षेत्रात भरडकिन्ही येथील शेतकरी पटवारी रामाजी गेडाम बरडकिन्ही यांच्या गट क्रमांक 262 मध्ये दि . ३/१०/२६ ला ते शेतावर गेले असता त्यांना एक वाघ मृत असल्याचे निदर्शनास आले. त्याबद्दल त्यांनी त्याची माहिती तात्काळ वन विभाग ब्रह्मपुरी येथे दिले माहितीच्या आधारे उपवनसंरक्षक डॉ. कुमारस्वामी यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक वन संरक्षक डॉ. महेश गायकवाड, वनपरिक्षेत्र अधिकारी अरुप कन्नमवार यांच्या नेतृत्वात मानद वन्यजीव रक्षक अमोद गौरकर, स्वाब संस्था अध्यक्ष यश कायरकर, वनरक्षक राजेंद्र भरणे, वनरक्षक दिलीप लाडे, सचिन शेंडे, मासाळकर, क्षेत्र सहाय्यक राकेश चौधरी यांच्या उपस्थितीत घटनास्थळाचा मोक्का पंचनामा करून मृत वाघाला शव विच्छेदनाकरिता ब्रह्मपुरी वन विभाग ब्रह्मपुरी येथे नेण्यात आले.
त्यानंतर ब्रह्मपुरी येथील संजय बावणे, सहाय्यक आयुक्त ब्रम्हपुरी, अतुल उरकुडे पशुवैद्यकीय अधिकारी ब्रम्हपुरी, मनोज पाटील पशुवैद्यकीय अधिकारी शंकरपूर यांच्याद्वारे वाघाचे शव विच्छेदन करून समोरील माहितीकरिता विसरा परीक्षणाकरता पाठवण्यात आला. घटनास्थळावरील चित्र पाहता परिसरातील उपस्थित वाघाने त्या परिसरात दाखल झालेल्या हा वाघ जंगलातून बाहेर निघून एका शेतात आल्यानंतरही त्याचा पाठलाग करून मारल्यानंतर या वाघाचा पाठलाग करून याला मारून अर्धवट खाल्ल्याचे निदर्शनास आले. मृत वाघ हा अंदाजे दीड ते दोन वर्षे वयाचा असून नर वाघ असल्याची शक्यता वर्तवण्यात आली. समोरील माहिती शव विच्छेदन अहवाल आल्यानंतर समजेल असेही वन विभागाद्वारे सांगण्यात आले. घटनास्थळी कॅमेरा ट्रॅप लावून कोणत्या वाघाच्या हमल्या मध्ये या वाघाचे मृत्यू झाले याबद्दल माहिती गोळा करण्यात येत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!