सावित्रीबाई फुले विद्यालय पवनी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांची जयंती संपन्न

विविध स्पर्धांचे आयोजन

तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - दि.०२/१०/२०२६ सावित्रीबाई फुले विद्यालय पवनी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुजाता गजभिये होत्या.सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पुजन करुन व पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.यावेळी जयंतीनिमित्त भाषण स्पर्धा गित गायन व वादन स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.शालेय विद्यार्थ्यांनी भाषण स्पर्धेतुन महात्मा गांधी व लाल शास्त्री यांच्या जिवन कार्याचा गौरव केला.अध्यक्षिय भाषणातून मुख्याध्यापिका सुजाता गजभिये यांनी थोर पुरुषांचे विचार आचरणात आणले पाहिजे याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन राज्य पुरस्कृत शिक्षक अशोक गिरी यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संदीप मुंडले,ललिता डेकाटे, अर्चना दडवे,प्रतिक रंगारी,काजल नाकाडे,सुमय्या शेख तथा शालेय विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!