शेगाव बु. प्रशासकाचा अजब अफलातून कारभार..
गावातील खड्डे बुजवण्यासाठी चुरी, मुरुमा ऐवजी चक्क मातीचा वापर....
वरोरा तालुक्यातील शेगाव बु. तालुक्यातील सर्वात मोठे गाव असून गावाची लोकसंख्या दहा हजाराच्या वर आहे तसेच या गावाला परिसरातील जवळपासचे 50 ते 60 खेडे जोडली गेलेली असून या गावांमध्ये दरवर्षी मस्कऱ्या गणपती विसर्जन मिरवणूक मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरी केली जाते हे विसर्जन मिरवणूक गणपती मंडळ कडून वेगवेगळ्या ठिकाणावरून आष्टा बायपास, राम मंदिर रोड, जिल्हा परिषद शाळा, मेडिकल चौक, मध्ये येऊन एका रांगेत गावातील मुख्य रस्त्यावरून बस स्थानकाकडे चिमुर, वरोरा 353 ई महामार्गावर निघत असुन ही मिरवणूक पाहण्यासाठी विविध ठिकाणाहुन भाविक भक्त मोठ्या संख्येने येत असतात.
दरवर्षी सर्व गणपती मंडळाचे स्वागत करण्यासाठी विविध राजकीय पक्षाकडून मंडप टाकण्यात येते तसेच काही सामाजिक कार्यकर्ते,शेगाव व्यापारी मंडळीकडून या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला जातो, तसेच शेगाव बु. येथील जमा मज्जित कमिटी कडून सुद्धा गणपती मंडळाचे आत्म सन्मानाने उत्साहात स्वागत केले जाते.
याच पार्श्वभूमीवर शेगाव बु. येथील मुख्य रस्ता व आष्टा बाँयपास येथून सर्व गणपतीची मिरवणूक निघत असताना या रस्त्यावर पडलेल्या मोठमोठे खड्डे बुजवण्यासाठी शेगाव प्रशासक यांनी चुरी,मुरमा ऐवजी चक्क मातीचा वापर केलेला आहे.
सुरू असलेल्या सणासुदीच्या काळात तसेच समोर येणाऱ्या नवरात्र ,दसरा, दिवाळी सणामध्ये कदाचित या मातीवर पाऊस पडला किंवा पाणी साचले तर चिखल तयार होऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे शेगाव बु. प्रशासकाला हा शहाणपणा सुचला कुठून असा प्रश्न गावातील सुज्ञ नागरीकाकडून उपस्थित करण्यात येत आहे..
या बद्दल गावातील नागरिक विनोद राऊत यांनी शेगाव बु. ग्रामपंचायत मध्ये प्रशासक म्हणून असलेले ग्रामसेवक मुकाडे यांना फोन करून विचारणा केली असता आमच्याकडे निधीच उपलब्ध नाही त्यामुळे आम्ही चुरी, मुरमा ऐवजी मातीचा वापर केला असे त्यांनी यावेळी सांगितले....



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!