मूलमध्ये गोंडवाना विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धेचा थरार!
दिनांक 07ऑक्टोबर रोजी बुधवार ला *गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली,अंतर्गत क्रीडा संकुल मुल. तसेच गृप ऑफ फिट लिफ्टर्स मुल.* यांच्या सयुक्त विद्यमानाने वेटलिफ्टिंग प्रशिक्षण केंद्र क्रीडा संकुल मुल येथे ग्रुप ऑफ फिट लिफ्टर्स चे संचालक तसेच वेटलिफ्टिंग एन आय एस कोच करण सुरेश कोसरे ह्याच्या मार्गदर्शनाखाली गोंडवाना विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या क्रीडा स्पर्धेमध्ये गोंडवाना विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या विविध महाविद्यालयाचे खेळाडू सहभागी झाले होते, यामध्ये कर्मवीर महाविद्यालय मुल. खत्री महाविद्यालय तुकुम. सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर. चिंतामणी महाविद्यालय घुगुस. आनंद निकेतन विद्यालय वरोरा. एन एच कॉलेज ब्रह्मपुरी. शारीरिक शिक्षण महाविद्यालय विसापूर. अशा विविध महाविद्यालयातील खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करून स्पर्धेला सुरुवात करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष सौ. एकताताई प्रशांत समर्थ बाधकाम सभापती प्रशांत भाऊ समर्थ, डॉ. खत्री महाविद्यालयाचे शारीरिक क्रीडा शिक्षक डॉ. आशिष चाहारे सर, स्वामी विवेकानंद विद्यामंदिर मुलचे, क्रीडा शिक्षक रूपचंद उराडे सर, अजुभाऊ कांबळे, अमोल भाऊ आवळे, भूषण भाऊ देशमुख, शार्वेल देआरकर, उदय मेडूलवार सर,अजिजू खान सर होते स्पर्धेमध्ये सर्वप्रथम यावर्षी झालेला क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, अंतर्गत नागपुर विभागीय शालेय वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धेतील
19 वर्षे वयोगटातील
1. 48 किलो वजन गटात जसविंदरकौर बावरी
2. 53किलो वजन गटात श्रावणी आंबूलकर
3. 58किलो वजन गटात शिवाणी वाढई
4. 86किलो वजन गटात नंदिनी चौधरी
प्रथम क्रमांक पटकावून राज्य स्तरीय वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धेत निवड झाल्याबद्दल
तसेच
17 वर्षे वयोगटातील
1. 48 किलो वजन गटात ईशानी मोहूर्ले
2. 77 किलो वजन गटात प्रणाली झरकर
तर
19वर्षे वयोगट मुलांमध्ये
1. अमन शेख
या द्वितीय क्रमांक पटकाविलेल्या विजयी खेळाडूंना स्वामी विवेकानंद विद्या मंदिर मूलचे क्रीडाशिक्षक रूपचंद उराडे सर यांच्यातर्फे सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला त्यानंतर लगेच स्पर्धेला सुरुवात करण्यात आली या स्पर्धेमध्ये खेळाडूंनी आपापल्या वजन गटांमध्ये आपापल्या महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करीत घवघवीत विजय संपादित केला त्यानंतर विजयी खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला झालेल्या वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये ग्रुप ऑफ फिट लिफ्टच्या दोन खेळाडूंनी आपापल्या वजन गटांमध्ये विजय संपादित करून आपल्या मूल शहराचे नाव रोशन केले यामध्ये 49 किलो वजन गटामधील श्रुती चंद्रकांत लोणबले तर 57 किलो वजन गटांमध्ये क्षितिजा अजय कांबळे यांनी इतर खेळाडूंवर मात करीत आपल्या महाविद्यालयाचे तसेच मूल शहराचे नाव रोशन केलेले आहे पुढे होणाऱ्या संकालचंद पटेल विद्यापीठ विसनगर, गुजरात येथे 27-28 आक्टोंबर रोजी वेस्ट झोन आंतर विद्यापीठीय वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये हे दोन खेळाडू गोंडवाना विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहेत सर्व मान्यवरांतर्फे विजयी खेळाडूंचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!