शेतकऱ्यांना 12 तास विज पुरवठा उपलब्ध करून द्या
राजूभाऊ चिकटे यांची महावितरण कार्यालयाला मागणी
तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
वरोरा : - शेगाव बु.महावितरण कार्यालय अंतर्गत येत असलेल्या शेगाव धानोली दादापूर चारगाव, अर्जुनी, ईतर गावांतील शेतकऱ्यांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी बाजार समितीचे माजी सभापती तसेच काँग्रेस तालुकाध्यक्ष राजुभाऊ चिकटे यांनी महावितरण कार्यालय शेगाव बु येथे शंभरच्या वर शेतकऱ्यासहीत दाखल होत परिसरातील धान पिके येणाऱ्या रब्बी हंगामातील गहू, चना, जवस इतर पिकासाठी शेतकऱ्यांना सिंचनासाठी पुरेसे पाणी मिळावे आणि त्यांच्या शेतीचा प्रश्न सुटावा, यासाठी 12 तास विज पुरवठा सुरळीत ठेवण्याची मागणी शेगाव येथील अभियंता खोब्रागडे यांना केलेली आहे.
यावेळी उपस्थित काँग्रेसचे कार्यकर्ते योगेश खामनकर,बंडूभाऊ शेळके, विलास बोढे,शरद मोडक, देवराव बोधणे,हरीशभाऊ, जाधव,शांताराम तितरे, दशरथ देहरकर, सहित चारगाव, अर्जुनी तुकुम,धानोली,दादापुर, शेगाव येथील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!