चारगाव मध्यम प्रकल्प अंतर्गत रब्बी हंगामाकरीता बैठक संपन्न

पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती

तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - पाटबंधारे विभाग अंतर्गत असलेल्या चारगाव बु. मध्यम प्रकल्प अंतर्गत येत असलेल्या क्षेत्रातील शेतकरी यांची चारगाव बु.येथे रब्बी हंगामातील निवारण करीता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आज दिनाक.२२/१०/२०२६ रोजी पाठबंधारे विभाग चारगाव बु. चारगाव खू.मानोरा, बोरगाव, कवडसी,कारेगाव, वडधा, धानोली, दादापूर, नवरगाव रिठ,शेगाव खु.चंदनखेडा,आष्टा, चंदनखेडा मत्ता, चरुड येथील परिसरातील शेकडो शेतकरी  तसेच बाजार समितीचे माजी सभापती तथा काँग्रेस तालुका अध्यक्ष राजूभाऊ चिकटे, योगेश खामणकर,बंडुभाऊ शेडके, विलास बोढे, शरद मोडक, देवराव बोधणे विकास धांडे शांताराम तितरे हरीश जाधव, दशरथ देहरकर व परिसरातील अनेक शेतकरी या बैठकीला उपस्थित असून येणारा रब्बी हंगामा करीता चारगाव मध्यम प्रकल्प येथील पाणी नियोजन संदर्भात बैठक संपन्न झाली.
चारगाव मध्यम प्रकल्पांतर्गत जवळपास 21 किलोमीटर असून पाठबंधारे विभागाचे अधिकारी यांच्या समवेत चर्चा होऊन खरिब धान पिकासाठी 10 नोव्हेंबर पर्यंत चारगाव धरणातून पाणी  शेतकऱ्यांच्या मागणीनुसार देण्याचे ठरले व रबी हंगामात घेण्यात येणाऱ्या गहू, चना,जवस पिकाकरीता दोन वेळा पाणी देण्याचे मान्य केले सद्या चारगाव खुर्द प्रकल्पामध्ये 82 टक्के पाण्याचा साठा उपलब्ध आहे. त्यापैकी शासनाच्या निर्देशानुसार 47% पाणीसाठा राखीव ठेऊन उर्वरित पाणी शेतीसाठी देण्याची मागणी संबंधित शेतकरी व राजूभाऊ चिकटे यांनी केली त्यावर यशश्वी चर्चा होऊन उपस्थित राजेश कांबळे उपविभागीय अभियंता उपविभाग वरोरा, अरहत पाझारे शाखा अभियंता सिंचन शाखा चारगाव बुज, जयदीप मोरे सहाय्यक कृषी अधिकारी आशुतोष धुडसे साहेब कृषी अधिकारी पारडी, रवींद्र नांदे,भुपेश तितरे,ताराचंद पाटील पाठबंधारे विभागाचे अधिकारी यांनी शेतकऱ्यांची समस्या जाणून मागणी मान्य केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!