सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या ३१ विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय बाल चित्रकला स्पर्धेत कलात्मक भरारी
मुख्याध्यापिका सुजाता गजभिये यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण
तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - दि.२३/१०/२०२६ महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत कला संचालनालय,महाराष्ट्र राज्य,मुंबई यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय बाल चित्रकला स्पर्धेत पवनी येथील सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या ३१ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.विविध गटांत आयोजित या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे प्रदर्शन केले.
स्पर्धेचा निकाल २१ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आला. त्यानंतर विजेते व सहभागी विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे शाळेच्या लॉगिनवर उपलब्ध झाली.या अनुषंगाने २३ ऑक्टोबर रोजी विद्यालयात प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम घेण्यात आला. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुजाता गजभिये यांच्या हस्ते स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे वितरित करून त्यांचा गौरव करण्यात आला.यावेळी विद्यार्थ्यांना पुढील कलात्मक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
चित्रकलेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळावा आणि त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे,या दृष्टीने अशा स्पर्धांचे महत्त्व अधोरेखित होते.राज्यस्तरीय स्पर्धेत विद्यालयातील ३१ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविल्याने विद्यार्थ्यांमधील कलाविषयक आवड आणि उत्साह दिसून आला.
या वेळी विद्यालयातील शिक्षक अशोक गिरी,संदीप मुंडले,ललिता डेकाटे,अरुणा कांबळे,अर्चना दडवे,स्मिता मोहरकर,प्रतीक रंगारी,सुमय्या शेख तसेच विद्यार्थी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!