ऋतुजा कोरेवार हिची एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी निवड -

  


सावली - तालुक्यातील खेडी येथील कु. ऋतुजा विजय कोरेवार हिने राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET-UG 2026) मध्ये ५६२ गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले होते. नुकतीच वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी महाराष्ट्र राज्यातील दुसरी यादी जाहीर झाली. त्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे निवड झाली आहे. 

     ऋतुजा ही पंचायत समितीचे माजी सभापती विजय कोरेवार यांची मुलगी असून ऋतुजाने सातत्यपूर्ण अभ्यास, कठोर परिश्रम आणि पालक व शिक्षकांच्या मार्गदर्शनाच्या बळावर अतिशय कठीण असलेल्या परीक्षेत यश मिळवले आहे. तिची नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी दुसऱ्या फेरीत निवड झाली असून पहिल्या यादीत इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तिची निवड झाली होती. तिच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत. ऋतुजा  कोरेवार हिच्या या यशामुळे वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने तिने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!