कराटेत स्वयंम धनजुलेची ‘सुवर्ण’ झेप!
६६ किलो वजनी गटात दमदार कामगिरी; वैनगंगा विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा
तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - वर्धा येथे आयोजित करण्यात आलेल्या इंटर-स्कूल ओपन कराटे चॅम्पियनशिप २०२६ स्पर्धेत पवनी येथील वैनगंगा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता नववीतील विद्यार्थी स्वयंम धनजुले याने उत्कृष्ट कामगिरी करत अंडर-१७, ६६ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले.
स्वयंमने स्पर्धेत आपल्या ताकद, अचूक तंत्र, शिस्त आणि आत्मविश्वासाच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना मात देत ही उल्लेखनीय कामगिरी केली. त्याच्या दमदार खेळाचे उपस्थितांनी कौतुक केले. या विजयामुळे स्वयंमने आपल्या विद्यालयाचे नाव उज्ज्वल करण्यासोबतच पवनीच्या क्रीडा क्षेत्रातही मानाचा ठसा उमटविला आहे.
स्वयंम धनजुलेच्या या यशाबद्दल वैनगंगा एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष गणेश तर्वेकर, सचिव विनोदजी मेंढे, संचालिका भावनाताई तर्वेकर, प्राचार्य अजय ठवरे, उपप्राचार्य प्रमोद मेश्राम, पर्यवेक्षक विकास रिनके यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्याचे अभिनंदन केले.
स्वयंमच्या या यशामुळे विद्यालयातील क्रीडा क्षेत्राला नवी प्रेरणा मिळाली असून, त्याच्या पुढील क्रीडा कारकिर्दीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!