महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ डिजिटल मीडियाच्या चिमूर तालुकाध्यक्षपदी पत्रकार सुनिल हिंगणकर यांची नियुक्ती
मुल येथील बैठकीत नियुक्ती; वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ डिजिटल मीडिया विभागाच्या चिमूर तालुका अध्यक्षपदी पत्रकार सुनिल हिंगणकर यांची नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ डिजिटल मीडियाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष ॲड. राहुल थोरात यांनी ही नियुक्ती जाहीर केली.
चंद्रपूर जिल्ह्यातील मुल येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने आयोजित बैठकीत ही नियुक्ती करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ निवड समितीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. महेश पाणसे होते.
यावेळी पत्रकार संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी प्रदीप रामटेके, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष शंकर बोरसरे, डिजिटल मीडियाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष ॲड. राहुल थोरात, चंद्रपूर जिल्हा सरचिटणीस केवलसिंग जुनी, चिमूर तालुका संघटक विलास मोहिनकर यांच्यासह चंद्रपूर जिल्ह्यातील पत्रकार संघाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान डिजिटल मीडिया विभागाच्या चिमूर तालुका अध्यक्षपदी सुनिल हिंगणकर यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली. यासोबतच चंद्रपूर जिल्ह्यातील विविध तालुक्यांच्या अध्यक्षपदावरही नवनियुक्त्या करण्यात आल्या.
पत्रकारिता क्षेत्रात निर्भीड, निष्पक्ष आणि सामाजिक प्रश्नांना प्राधान्य देणारे पत्रकार म्हणून सुनिल हिंगणकर यांची ओळख आहे. डिजिटल मीडिया विभागाच्या माध्यमातून चिमूर तालुक्यातील जनतेच्या विविध प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडून पत्रकार संघटनेचे कार्य अधिक बळकट करतील, असा विश्वास यावेळी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
नवनियुक्त तालुकाध्यक्ष सुनिल हिंगणकर यांचे उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील सामाजिक व पत्रकारितेच्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!