चंद्रपूर तालुका राज्य सरकारी कर्मचारी गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्षपदी प्रदीप उमरे
सचिवपदी प्रमोद बेहरम यांची अविरोध निवड; नवीन संचालक मंडळाची कार्यकारिणी गठित
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील तसेच चंद्रपूर तालुक्यातील ज्येष्ठ आणि लौकिकप्राप्त चंद्रपूर तालुका राज्य सरकारी कर्मचारी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्षपदी प्रदीप उमरे, तर सचिवपदी प्रमोद बेहरम यांची अविरोध निवड करण्यात आली. संस्थेच्या चिंचाळा येथील कार्यालयात पार पडलेल्या निवड प्रक्रियेत नवीन संचालक मंडळाचीही सर्वानुमते निवड करण्यात आली.
महाराष्ट्रातील कामगार-कर्मचाऱ्यांचे ज्येष्ठ नेते र. ग. कर्णिक साहेब यांच्या शुभहस्ते या संस्थेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली होती. तसेच चिंचाळा येथे त्यांच्या हस्ते संस्थेचे भूमिपूजन पार पडले होते. अशा ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या संस्थेच्या सन २०२५-२६ ते २०३०-३१ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
ही निवड प्रक्रिया प्रसन्नकुमार बी. नंदेश्वर (ई. वर्ग सं. निवडणूक निर्णय अधिकारी), सहकारी संस्था, चंद्रपूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी अध्यक्षपदी प्रदीप उमरे आणि सचिवपदी प्रमोद बेहरम यांची अविरोध निवड घोषित करण्यात आली.
नवीन संचालक मंडळ
संस्थेच्या संचालक मंडळावर उषा जोगी, नालंदा ब्राम्हणे, किरण सुपहा, अशोक कन्नाके, नानाजी बोगेवार, चेलेश्वर तोतडे, प्रदीप उमरे आणि प्रमोद बेहरम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
निवडीनंतर नवनियुक्त पदाधिकारी व सदस्यांनी संस्थेच्या विविध समस्या आणि भविष्यातील विकासकामांबाबत सविस्तर चर्चा केली.
संस्थेच्या विकासाचा निर्धार
नवनियुक्त अध्यक्ष प्रदीप उमरे यांनी यावेळी माजी अध्यक्ष मधुकर आकुलवार आणि माजी संचालक वामनराव जुनघरे यांचे विशेष आभार मानले. या नवीन कार्यकारिणीचा मजबूत पाया रचून संस्थेला अवसायनात जाण्यापासून वाचविण्यात त्यांचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले.
संस्थेमध्ये पोलिस विभाग, पाटबंधारे विभाग, आयटीआय, आरोग्य विभाग, सेल्स टॅक्स विभाग यासह विविध प्रशासकीय विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची एकूण ७१ निवासस्थाने असल्याची माहिती त्यांनी दिली. या सर्व ७१ सदस्यांचे आभार व्यक्त करताना संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी नवीन कार्यकारिणी कटिबद्ध असल्याचे उमरे यांनी सांगितले.
भविष्यात संस्थेच्या ओपन स्पेसमध्ये सामाजिक सभागृह, ओपन जिम, वॉकिंग ट्रॅक, गार्डन, अभ्यासिका तसेच इतर मूलभूत सुविधांची उभारणी करण्यासाठी पुढाकार घेण्यात येईल. यासोबतच संस्थेतील सिमेंट काँक्रीटचे मजबूत रस्ते, ड्रेनेज लाईन, सांडपाणी वाहून नेण्यासाठी प्रशस्त नाल्या यांसारख्या आवश्यक कामांना प्राधान्य दिले जाईल.
स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच संबंधित प्रशासकीय यंत्रणेकडे ठोस पाठपुरावा करून संस्थेतील प्रलंबित समस्या आणि अडचणी प्राधान्याने सोडविण्याचा निर्धारही अध्यक्ष प्रदीप उमरे यांनी व्यक्त केला.
मान्यवरांची उपस्थिती
या निवड सभेला अगस्ती मेश्राम, प्रमोद वंजारी, लोमेश ब्राम्हणे, बबन देशटीवार, मधुकर आकुलवार, नानाजी बोगेवार, चेलेश्वर तोतडे, वामन जुनघरे, प्रमोद बेहरम, प्रदीप उमरे, किरण सुपहा, उषा जोगी, नालंदा ब्राम्हणे, अशोक कन्नाके, महादेव बेलखुडे यांच्यासह संस्थेचे सदस्य व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवड सभेचे संचालन माजी संचालक वामन जुनघरे यांनी केले, तर प्रास्ताविक माजी अध्यक्ष मधुकर आकुलवार यांनी केले. नवीन अध्यक्ष, सचिव व संचालक मंडळाच्या अविरोध निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, संस्थेच्या विकासाला आता नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!