दर्याभवानी’च्या चित्रीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण

‘दर्याभवानी’च्या चित्रीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित आगामी मराठी ऐतिहासिक चित्रपटाची जोरदार तयारी



मुंबई : श्री तिरुपती बालाजी चित्र प्रस्तुत आणि एलीव्हेट फिल्म्स निर्मित, निर्माता प्रकाश पाटीलडॉ. अशोक जिवतोडे यांच्या आगामी मराठी ऐतिहासिक चित्रपट ‘दर्याभवानी’च्या चित्रीकरणाचा पहिला टप्पा नुकताच पूर्ण झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर करीत आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील इतिहास, शौर्य, पराक्रम आणि स्वराज्याच्या संघर्षाची पार्श्वभूमी असलेल्या या ऐतिहासिक चित्रपटाकडे मराठी चित्रपटसृष्टीसह प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. भव्य ऐतिहासिक मांडणी, दमदार कलाकारांची फळी आणि दिग्पाल लांजेकर यांचे दिग्दर्शन यामुळे ‘दर्याभवानी’ हा चित्रपट विशेष ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

चित्रीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर निर्माता प्रकाश पाटील, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि अजिंक्य पाटील यांच्या उपस्थितीत या टप्प्याचा आढावा घेण्यात आला. चित्रपटाच्या पुढील चित्रीकरणासाठीही टीम सज्ज झाली आहे.

‘दर्याभवानी’मध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणार आहेत. अभिजीत श्वेतचंद्र, मृणाल कुलकर्णी, समीर धर्माधिकारी, स्मिता शेवाळे, अजय पूरकर, मृण्मयी देशपांडे, ऋषी सक्सेना, आस्ताद काळे, प्रसन्न केतकर, निखिल राऊत, नितीन वाघ आणि सचिन देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

ऐतिहासिक विषयाला भव्य पडद्यावर साकारण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात येत असून, निर्मितीपासूनच ‘दर्याभवानी’बाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. पहिला चित्रीकरण टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याने आता चित्रपटाच्या पुढील टप्प्याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

निर्मिती : एलीव्हेट फिल्म्स
प्रस्तुती : श्री तिरुपती बालाजी चित्र
निर्माता : प्रकाश पाटील, डॉ. अशोक जिवतोडे
दिग्दर्शक : दिग्पाल लांजेकर
चित्रपट : ‘दर्याभवानी’

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!