राजीव गांधी नगर वडाळा प्रभाग क्रमांक ४ मध्ये तान्हा पोळा उत्साहात; २५० बालगोपालांचा उत्स्फूर्त सहभाग
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर शहरात राजीव गांधी नगर, वडाळा, प्रभाग क्रमांक ४ येथील जय माँ दुर्गा भवानी मंदिरातर्फे आयोजित करण्यात आलेला तान्हा पोळा उत्सव मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या उत्सवाला बालगोपालांसह पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
तान्हा पोळ्यानिमित्त परिसरातील तब्बल २५० बालगोपालांनी आपल्या नंदीबैलांसह सहभाग नोंदविला. बालगोपालांनी आकर्षक पद्धतीने नंदीबैलांची सजावट करून पारंपरिक पद्धतीने पोळा साजरा केला. सजविलेले नंदीबैल, बालगोपालांचा उत्साह आणि पालकांची उपस्थिती यामुळे संपूर्ण राजीव गांधी नगर वडाळा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया यांच्यातर्फे बालगोपालांना ३ सायकलींचे वाटप करण्यात आले. तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रदीप बंडे यांच्यातर्फे १ सायकल देण्यात आली.
याशिवाय निलम राचलवार, दिपक तिवाडे सर,योगेश ठुणे, कमल असावा, राहुल असावा, रमेश कराळे, गिरीश राचलवार, आशिषभाऊ अड्याळवाले, पांडुरंग मोरे, रामभाऊ करारे, गुणवंत मांडवकर, डॉ. पाचभाई, राजू कारेकार, भोपे, बंडू पाटील हिवरकर, भोपे सर, शामदेव कुरटकर सर, येकोणकर सर, मेश्राम सर, कामडी सर, श्रीमती रेखाताई मालोदे कृषी उत्पन्न बाजार समिती चिमूर संचालिका तसेच अन्य मान्यवरांच्या वतीने बालगोपालांना विविध गिफ्टचे वाटप करण्यात आले.
तान्हा पोळ्याच्या माध्यमातून बालगोपालांना आपल्या मातीशी, शेतकरी संस्कृतीशी आणि पारंपरिक सण-उत्सवांशी जोडण्याचा सुंदर उपक्रम जय माँ दुर्गा भवानी मंदिर समितीतर्फे राबविण्यात आला. कार्यक्रमात सहभागी झालेल्या बालगोपालांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्साह विशेष आकर्षण ठरला.
राजीव गांधी नगर वडाळा, प्रभाग क्रमांक ४ येथील नागरिक, पालक आणि बालगोपालांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे यंदाचा तान्हा पोळा मोठ्या आनंदात आणि उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जय माँ दुर्गा भवानी मंदिर समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!