नवरगावात ट्रॅक्टर पोळ्याची धूम! ३८ ट्रॅक्टर्सची वाजत-गाजत मिरवणूक




सिंदेवाही - 

बैलपोळ्याची परंपरा जपत शिंदेवाही तालुक्यातील नवरगावात यंदाही अनोख्या ट्रॅक्टर पोळ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यांत्रिकीकरणामुळे बैलांची संख्या घटत असताना, गेल्या ७ वर्षांपासून नवरगावात ट्रॅक्टर पोळा साजरा करण्याची नवी प्रथा रूजली आहे.

यंदा ३८ ट्रॅक्टर्सना फुलांनी, झेंड्यांनी सजवून मुख्य रस्त्यावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली. हा देखावा पाहण्यासाठी बालगोपालांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

या उपक्रमाचे कौतुक म्हणून माजी सरपंच तथा काँग्रेस शहर अध्यक्ष राहुल बोडणे यांच्यावतीने सर्व ट्रॅक्टर चालकांना वॉटर कॅन बक्षीस म्हणून देण्यात आले.

पारंपरिक आणि आधुनिकतेचा हा संगम संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!