चिमूर तालुक्यात पुन्हा अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल!

गोंदेडा जवळील वडशी येथील २५ वर्षीय आरोपीस अटक; BNS सह पॉक्सो कायद्यातील विविध कलमांन्वये कारवाई

उप संपादक 
विलास मोहिणकर 

चंद्रपूर : - चिमूर तालुक्यात अल्पवयीन मुलींशी संबंधित गुन्ह्यांच्या घटनांमुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात माजी सरपंचाविरुद्ध पॉक्सो कायदा व बलात्काराच्या आरोपांखाली गुन्हा दाखल झाल्याची घटना ताजी असतानाच चिमूर तालुक्यात आणखी एका प्रकरणात अल्पवयीन मुलीशी संबंधित गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी वडशी येथील उमेश रामराव भोयर (वय २५ वर्षे) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७४, ७५ (१),(२), ३५१ (१) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (POCSO Act) कलम ८ व १२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. संबंधित गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.

सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शितल खोब्रागडे करीत आहेत.

दरम्यान, चिमूर तालुक्यात अल्पवयीन मुलींशी संबंधित गुन्ह्यांची नोंद होत असल्याने महिला व बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशा प्रकरणांमध्ये पीडित बालकांची ओळख गोपनीय ठेवून कायदेशीर प्रक्रिया पार पाडणे आणि दोषींविरुद्ध कायद्यानुसार कारवाई होणे महत्त्वाचे आहे.

आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. या घटनेने चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात पुन्हा चर्चेला उधाण आले आहे.

लैंगिक अत्याचार व कायदेविषयक सल्ला प्रकरणी शाळा तसेच महाविधालये याठिकाणी पोलीस प्रशासनाकडून केलेली जनजागृती हि अतिशय जलद गतीने आणि नियमित करण्यात यायला हवी अशी मागणी जनतेतून होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!