प्रत्येक व्यक्तीने वृक्षारोपण करून त्याचे संगोपन करावे

वनपरीक्षेत्र अधिकारी योगेश शर्मा यांचे नागरिकांना आवाहन

तालुका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - एक व्यक्ती एक वृक्ष ही संकल्पना प्रत्यक्षात अंमलात आणून प्रत्येक व्यक्तीने एक वृक्ष लागवड करून त्याचे संगोपन करावे असे आवाहन अड्याळ वनपरीक्षेत्राचे वनपरीक्षेत्राधिकारी योगेश शर्मा यांनी केले.
 
ते जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित्त केसलवाडा येथील तथागत विद्यालयात(ता. 28) ला वृक्षारोपण त्याचप्रमाणे पर्यावरण संरक्षण, वृक्ष संवर्धन आणि निसर्ग जतन ह्या विषयावर घेतलेल्या निबंध स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना बोलत होते. ते पुढे म्हणाले की, पर्यावरणाच्या संवर्धनासोबतच विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेमाची  भावना जागृत व्हावी म्हणुन अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

कार्यक्रमाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक पद्माकर सावरकर हे होते. मुख्य मार्गदर्शक म्हणुन वनपरीक्षेत्राधिकारी योगेश शर्मा तर प्रमुख अतिथी म्हणुन अड्याळ क्षेत्राचे क्षेत्र सहाय्यक आर. आर. दुणेदार, किटाडी क्षेत्राचे क्षेत्र सहाय्यक मुकेश श्यामकुवर,महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे पवनी तालुकाध्यक्ष जयेंद्र चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. निबंध स्पर्धेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकविणाऱ्या विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

 कार्यक्रमाचे संचालन प्रदीप गोंडाने यांनी केले. तर आभार धनराज भोयर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता तथागत विद्यालयातील सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी त्याचप्रमाणे अड्याळ वन विभागातील वनरक्षक दिनेश बोरकर,राकेश कोदाणे,रोहिणी राऊत तसेच इतर कर्मचारीवृंद यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!