कुड्याच्या फुलाला जंगलात गेला, सटकला, पंधरा दिवसांनी त्याचा सापडाच मिळाला.



(घोडाझरी जंगलात मिळाला मानवाचा मृतदेह ,उष्माघाताने मृत्यूचा प्राथमिक अंदाज.)
यश कायरकर,(नागभीड तालुका प्रतिनिधि) :
    दि . 5 जुलै 26 रविवारी नागभीड वनपरिक्षेत्रातील कर्मचारी गस्त घालीत असतानाच घोडाझरी गावापासून अंदाजे दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर घनदाट जंगलात, नागभीड वन परिक्षेत्रातील उपक्षेत्र नागभिड ,आणि नियम क्षेत्र घोडाझरी कंपार्टमेंट नंबर 57 मध्ये गस्तीवर असताना एक दुर्गंधीच्या शोधात गेल्यानंतर  एक मानवी मृतदेह आढळून आला. त्या संदर्भात वरिष्ठांना माहिती देण्यात आली. नागभीड येथील वनपरिक्षेत्र अधिकारी सौ भारती बघमारे यांनी त्यासंदर्भात नागभीड पोलीस स्टेशनला सूचना देत घटनास्थळ गाठले. वन विभागा व पोलीस द्वारे घटना स्थळी पंचनामा करण्यात आला. त्यानंतर नागभीड पोलीस स्टेशन चे पी. आय. कोकाटे साहेब यांच्या मार्गदर्शनात पी.एस.आय.अजिक्य गोविंदलवार  प्राथमिक तपासणी वरून सदर मृतदेहाचे शवविच्छेदन आरोग्य अधिकारी तथा फॉरेन्सिक टीम द्वारे घटनास्थळीच करण्यात आले. मृत व्यक्ती हा चिमूर तालुक्यातील लावारी गावचा धर्माजी वारलू जेंगठे वय 65 वर्षे असल्याची ओळख पटली. 
    सविस्तर वृत्त, चिमूर तालुक्यातील लावारी येथील  धर्माजी वारलू जेंगठे वय 65 हा इसम 20 जूनला सकाळी साडेसहा वाजता तळोधी बा. वनपरिक्षेत्रातील बोर्ड नियत क्षेत्रामधील आपल्या काही साथीदारांसोबत कुळ्याचे फुल तोडण्याकरता गेला मात्र दुपारी संपूर्ण साथीदार वापस आले मात्र हा त्यांच्यासोबत परतलाच नाही याची घटना तात्काळ परिवार वाल्यांनी तळोधी वन परिक्षेत्राला दिली. त्यानंतर दुपारी दोन वाजता पासून तर सतत सात दिवस पर्यंत वन विभाग तळोधी, वन विभाग नागभीड  वनपरिक्षेत्र चिमूर, वनपरिक्षेत्रातील संपूर्ण वन कर्मचारी तथा चिमुर आणि तळोदी पोलिसांनी संपूर्ण जंगल परिसरात शोध मोहीम राबवली मात्र तो हरवल्यानंतर रात्र पासून पाऊस सुरू झाल्यामुळे शोध मोहिमेचे अडथळा निर्माण झाला. मात्र त्याचा सलग शोध सुरू असतानाच. हरवलेल्या जागेपासून घनदाट जंगलात पहाडांच्या मध्ये अंदाजे सहा ते सात किलोमीटर अंतरावर, काल नागभीड वनपरिक्षेत्रातील, उपक्षेत्र नागभीड, नियत क्षेत्र घोडाझरी, कंपार्टमेंट नंबर 57 मध्ये मृत अवस्थेत सापळा झालेला आढळून आला. घटनास्थळाची व मृतदेहाची संपूर्ण चौकशी केली असता, शरीरावर कुठल्याही प्रकारच्या इजा किंवा कोणत्याही प्राण्याने हमला करून मारण्याच्या कोणत्याही खुणा आढळून आलेल्या नाही. त्याच्या मृत शरीराच्या जवळच त्याने थैल्यामध्ये तोडलेला कुळ्याची फुले आणि थैल्यावर दगड  ठेवलेला, तसेच ओली झालेली टी-शर्ट बाजूला काढून ठेवल्याचे निदर्शनास आले. मात्र त्याचे मृत्यू जंगलात भटकत असताना जून महिन्यात अधिकच तीव्र उष्णता आणि ऊन असल्याने उष्माघातानेच मृत्यू झाल्याची शक्यता आहे.
सदर घटनेचा अधिक तपास नागभीड पोलीस स्टेशन चे पी. आय. कोकाटे यांच्या मार्गदर्शनात ए.एस.आय. संजय मांढरे नागभीड पोलीस स्टेशन यांच्याकडे  आहे. 
 " सध्या पावसाळा सुरू झालाय मात्र रानभाज्या, मशरूम तोडण्याच्या, गोळा करण्याच्या नादात लोकांनी जंगलात आत मध्ये जाऊ नये. आणि एकट्याने कुठेही भटकू नये,  वन्य प्राण्याचे हमलात जीव जाऊ शकते, किंवा जंगलाची माहिती नसल्यास हे आपल्या जीवावर बेतू शकते. आणि अशा घटना घडण्याची शक्यता घडू शकते. त्यामुळे लोकांनी सावधानता बाळगावी" - सौ भारती बघमारे वनपरिक्षेत्र अधिकारी नागभीड.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!