सावित्रीबाई फुले विद्यालयात एचपीव्ही लसीकरण जनजागृती कार्यशाळा संपन्न

तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - दि.११/०३/२०२६ सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने संपूर्ण देशात २८ फेब्रुवारीपासून एचपीव्ही (HPV) लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून, सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय, पवनी येथे विद्यार्थी व पालकांसाठी एक दिवसीय समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण रुग्णालय पवनी येथील डॉ. धनराज गभने यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा पार पडली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुजाता गजभिये होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. धनराज गभने आणि डॉ. वैशाली गभने यांची उपस्थिती होती.याप्रसंगी बोलताना डॉ. धनराज गभने यांनी एचपीव्ही लसीकरणाचे महत्त्व विशद केले. "गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून प्रतिबंध करण्यासाठी ही लस अत्यंत प्रभावी असून, पालकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपल्या पाल्यांचे लसीकरण करून घ्यावे," असे आवाहन त्यांनी केले. डॉ. वैशाली गभने यांनी लसीकरणानंतर घ्यायची काळजी आणि आरोग्यदायी सवयींबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका सुजाता गजभिये यांनी शाळा स्तरावर या मोहिमेला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.या कार्यशाळेला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार राज्य पुरस्कृत शिक्षक अशोक गिरी यांनी मानले.कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी अरुणा कांबळे,अर्चना दडवे,मानसी ठवकर,विना जिभकाटे,सुमय्या शेख तसेच शालेय विद्यार्थिनींनी विशेष परिश्रम घेतले.या उपक्रमाचे पालक वर्गातून कौतुक होत आहे.यावेळी सावित्रीबाई फुले विद्यालय पवनी येथे एचपीव्ही लसीकरण कार्यशाळेत मार्गदर्शन करताना डॉ.धनराज गभने, सोबत मुख्याध्यापिका सुजाता गजभिये,शिक्षक अशोक गिरी व इतर मान्यवर तथा विद्यार्थी विद्यार्थीनीची उपस्थिती होती.
 ९ ते १४ वयोगटातील मुलींसाठी ही लस अत्यंत सुरक्षित आणि महत्त्वाची असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!