शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ; नराधम शिक्षकावर कठोर कारवाईची मागणी
तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - दि.११/०३/२०२६ पवनी तालुक्यातील वडेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एका शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, आरोपी शिक्षकावर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी 'एनएसयुआय' (NSUI) भंडारा जिल्ह्याच्या वतीने करण्यात आली आहे.सविस्तर माहिती मिळालेल्या माहितीनुसार, अनिल राऊत असे या आरोपी शिक्षकाचे नाव आहे. तो वडेगाव येथील जि.प. प्राथमिक शाळेत कार्यरत आहे. शाळेतील एका अल्पवयीन विद्यार्थिनीला अश्लील व्हिडिओ दाखवून तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप राऊत याच्यावर करण्यात आला आहे. ही बाब समोर येताच पालकांमध्ये आणि शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
NSUI आक्रमक; पोलीस निरीक्षकांना दिले निवेदन
या गंभीर प्रकरणाची दखल घेत एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष रोहीत खोब्रागडे यांनी पवनी पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांना लेखी निवेदन सादर केले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, एका चिमुकलीसोबत शिक्षकाने केलेले हे कृत्य अत्यंत निंदनीय असून, यामुळे समाजातील सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे.
प्रमुख मागणी हि पीडित मुलीवर झालेल्या या छळ प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी.
आरोपी शिक्षक अनिल राऊत याला तत्काळ अटक करून कठोर कायदेशीर शिक्षा देण्यात यावी.
यावेळी पोलीस प्रशासनाला विनंती करण्यात आली आहे की,भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी या प्रकरणाचा तपास जलद गतीने करून पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा.या प्रकरणाकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून पोलीस काय पाऊले उचलतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.


Paragraph use kar , ani image cha vapar jast karava 🙏
उत्तर द्याहटवा