वाळू माफिया आणि पोलीस संबंधांच्या आरोपांची चौकशी कुठे थांबली? पत्रकारांवरील खंडणीच्या गुन्ह्यानेही उपस्थित केले गंभीर प्रश्न

वाळू माफिया पोलीस हवालदार यांचे व्यवहार उघळ 

उप संपादक 
विलास मोहिणकर 

चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर मध्ये वाळू माफियाकडून पत्रकारांवर खंडणीसारखे गंभीर व खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप जनतेसमोर येणे गरजेचे आहे. वाळू माफिया, पोलीस आणि पत्रकार यांच्यातील संभाषणांच्या ऑडिओ क्लिप सोशल मीडिया व इंस्टाग्रामच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या व्हायरल ऑडिओ क्लिप तसेच वाळू माफिया, दलाल आणि पोलीस कर्मचाऱ्यांकडून अवैध खंडणी वसुलीच्या आरोपांची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी साहिल झरकर, ब्रम्हपुरी, जिल्हा चंद्रपूर यांच्या स्तरावर सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, वाळू माफिया प्रथम संजय बाळबुधे आणि पोलीस हवालदार फाल्गुन परचाके यांचे बँक स्टेटमेंट समोर आल्याचे चित्र दिसून येत असून, त्यामध्ये वाळू माफिया आणि पोलीस यांच्यात पैशांची देवाणघेवाण झाल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे या प्रकरणातील पुढील कारवाई नेमकी कुठपर्यंत पोहोचली, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
दुसरीकडे, पाच पत्रकारांवर दाखल करण्यात आलेला खंडणीचा गुन्हा न्यायालयीन प्रक्रियेत असून, त्यांना न्याय कधी मिळणार, याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. पत्रकारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे तातडीने दाखल करून त्यांना अटक व न्यायालयात हजर केले जाते; मात्र संबंधित पोलीस कर्मचारी, दलाल व वाळू माफियांवर कारवाई करण्यात विलंब का होत आहे, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

महिने उलटूनही पोलीस कर्मचारी,महसूल कर्मचारी अधिकारी, दलाल आणि वाळू माफियांवरील कारवाई कुठे थांबली? या प्रश्नाचे उत्तर जनतेला कधी मिळणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. पोलीस प्रशासनाकडून चौकशी व तपास सुरू असल्याचे सांगितले जात असले, तरी चौकशीअंती ठोस कारवाई कधी होणार, हा प्रश्न कायम आहे.

या प्रकरणातील सर्व आरोपांची अधिकृत चौकशी होऊन सत्य परिस्थिती समोर येणे आवश्यक आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!