डॉ.मंजुषा दौलतराव सागर यांना स्वयंसिध्दा गौरव पुरस्कार 2026 प्रदान

तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ महिला मंच अमरावती यांच्यावतीने जागतिक महिला दिन कार्यक्रम 10 मार्च रोजी संपन्न झाला. कर्तृत्ववान महिलांचा सत्कार सोहळा या अंतर्गत  कांचन रिसॉर्ट अमरावती येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ.मंजुषा दौलतराव सागर या स्मॉल वंडर हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज वडकी तालुका राळेगाव येथे प्राचार्य या पदावर कार्यरत आहेत. गावात पहिल्यांदा जुनिअर कॉलेज  सुरुवात करणाऱ्या महिला म्हणून त्यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा भारतीय जनता पार्टी सदस्य शोभना देशमुख तर विशेष अतिथी सुलभाताई खोडके आमदार अमरावती यांना निमंत्रित करण्यात आले होते.प्रमुख अतिथी म्हणून प्रीती देशमुख प्रकल्प संचालक जी प्रा विकास यंत्रणा डॉ.अनुभूती पाटील स्त्रीरोग तज्ञ राजश्री जढाळे संचालक महात्मा फुले अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक अक्षरा लहाने विदर्भ कार्याध्यक्ष महिला मंच येथील भारतीय पत्रकार संघ राष्ट्रीय अध्यक्ष भा.ग्रा. पत्रकार संघ कैलास बापू देशमुख राष्ट्रीय संघटक तथा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष युसुफभाई खान राष्ट्रीय कार्याध्यक्ष मान्यवरांच्या हस्ते सत्कार सर्वांचा सत्कार करण्यात आला.  क्रीडाक्षेत्र उद्योग क्षेत्र ,पत्रकारिता, शिक्षण क्षेत्र आरोग्यसेवा ,कलाक्षेत्र संगीतक्षेत्र ,लेखन क्षेत्र , अशा विविध क्षेत्रातून एकूण 15 महिलांचा सत्कार यावेळी घेण्यात आला.आदिती मेहता यांच्या क्लासिकल नृत्याने कार्यक्रमाला आणखीच बहर आला .गौरी सतके यांनी सत्यम शिवम सुंदरा गीत सादर केले. कार्यक्रमाचे संयोजन व संचालन कांचन मूरके अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ महिला मंच अध्यक्ष यांनी केले. तर कार्यक्रमासाठी राजेंद्र ठाकरे यांचे मुलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले  कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ मंजुषा सागर यांनी केले कार्यक्रमास विविध पत्रकार तसेच अखिल भारतीय पत्रकार परिषदेतील अनेक पदाधिकारी व पत्रकार मंडळींनी कार्यक्रमास हजेरी लावली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!