मिंडाळा येथे होणाऱ्या श्रीछत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर यशस्वी करा!

मिंडाळा येथे होणाऱ्या श्रीछत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर यशस्वी करा!     
        उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील.



तळोधी (बा.) प्रतिनिधी:+
    महाराष्ट्र राज्य शासन द्वारा आयोजित श्रीछत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरांचे आयोजन दिनांक 14 मार्चला ग्रामपंचायत कार्यालय मिंडाळा ता. नागभिड येथे आयोजित केले आहे. अभियान यशस्वीतेसाठी दिनांक 11 मार्चला मंडळातील सरपंच तथा गावातील प्रतिष्ठित नागरिक व शेतकरी तसेच मंडळातील ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांची तालुक्यातील उपविभागीय अधिकारी श्रीमती पर्वणी पाटील यांनी आढावा सभा घेऊन शिबिरात देण्यात येणाऱ्या सेवा व वेळीच होनारी कामे याबाबत मार्गदर्शन केले तसेच सर्व उपस्थितानी आपल्या गावामध्ये प्रसिद्धी देऊन दिनांक 14 मार्चला होणारा अभियान यशस्वी करावा व बहुसंख्येने उपस्थित राहून आपले महसूल विषयक प्रश्न निकाली काढावे असे आव्हान नागभीड तालुक्याचे उपविभागीय अधिकारी श्रीमती पर्वणी पाटील तसेच तहसीलदार उमेश कावळे, अप्पर तहसीलदार शेखर पुनसे, महसूल मंडळ अधिकारी सुभाष बोड्डावार, मंडळातील ग्राम महसूल अधिकारी दिशा मेश्राम, राजेंद्र अतकरे, विकास मेश्राम यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!