काँग्रेस च्या ध्वजावर भाजप ने साधला डाव
अभयंकर मैदान किल्ला येथील ध्वजारोहणावरून काँग्रेसचे ठिय्या आंदोलन
मुख्याधिकाऱ्यांच्या स्पष्टीकरणाची मागणी; तब्बल ३ ते ४ तास आंदोलनानंतर लेखी निवेदन देत आंदोलन स्थगित
चिमूर शहरात वातावरण तापले
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - अभयंकर मैदान, किल्ला चिमूर येथे १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यापासून काँग्रेस पक्षातर्फे सकाळी ९.४५ वाजता ध्वजारोहण करण्याची परंपरा कायम असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. मात्र, १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ७ ते ८ वाजेदरम्यान नगर परिषद चिमूरच्या कुणाल कावरे नगरसेवक तथा स्वच्छता सभापती यांनी हेतूपूरस्पर ध्वजारोहण केले. याची माहिती मिळताच चिमूर शहरात चर्चेला उधाण आले. आणि या घटनेची दखल घेत या प्रकाराचा निषेध नोंदवत काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपली परंपरा कायम ठेवत अभयंकर मैदान येथे जाऊन ध्वजास सलामी देत मानवंदना दिली.
हि भाजप आणि मुख्याधिकारी यांच्या आदेशाने या परंपरेत बदल करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला.
यानंतर शेकडो कार्यकर्त्यांनी नगर परिषद कार्यालय गाठून मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधात मुख्याधिकारी मुर्दाबाद, इन्कलाब जिंदाबाद वंदे मातरम ची घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन सुरू केले. मुख्याधिकारी नागपूर येथे गेल्याचे सांगण्यात आल्यानंतरही, मुख्याधिकारी प्रत्यक्ष नगर परिषदेत येऊन या प्रकाराबाबत स्पष्टीकरण देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका काँग्रेसने घेतली.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे व पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधत मुख्याधिकारी नागपूर येथे गेल्या असून, आपले म्हणणे लेखी स्वरूपात द्यावे, असे आवाहन केले. मात्र, काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून स्पष्टीकरण देण्याची मागणी कायम ठेवली.
सुमारे ३ ते ४ तास आंदोलन सुरू राहिल्यानंतर मुख्याधिकारी नगर परिषदेत दाखल झाल्या. ध्वजारोहणाबाबत विचारणा केली असता, नगर परिषदेच्या ठरावानुसार संबंधित ठिकाणी असलेल्या नगरसेवकांनी ध्वजारोहण करावे, असे आदेश असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, काँग्रेसच्या नगरसेवकांना याबाबत कोणतीही सूचना अथवा माहिती देण्यात आली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्याधिकाऱ्यांच्या या स्पष्टीकरणावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी पुन्हा आक्षेप घेत आंदोलन तीव्र केले आणि वारंवार इन्कलाब जिंदाबाद मुख्याधिकारी मुर्दाबाद चे नारे देत निषेध नोंदविण्यात आला. त्यानंतर काँग्रेसतर्फे मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदन देण्यात आले. आमदार विजय वडेट्टीवार यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधून घटनेची माहिती देण्यात आली. तसेच आमदार वडेट्टीवार यांनी मुख्याधिकारी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे यांच्याशी चर्चा केली.
चर्चेनंतर काँग्रेसने शांततेच्या मार्गाने आंदोलन स्थगित केले. मात्र, या प्रकरणी लेखी उत्तर सादर झाल्यानंतर पुढील भूमिका ठरविण्यात येईल, असा इशारा काँग्रेसतर्फे देण्यात आला.
यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष विजय पाटील गावंडे, राम राऊत (सेवादल प्रदेश महासचिव), धनराज मुंगले (उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश ओबीसी विभाग) व गजानन बुटके (जिल्हा महासचिव) यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!