सावित्रीबाई फुले विद्यालयाची तंत्र प्रदर्शनाला भेट




तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - दि.१४/०१/२०२६
येथील सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्थानिक संत जगनाडे महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) पवनी येथे आयोजित तंत्र प्रदर्शनाला भेट देऊन तांत्रिक ज्ञानाची माहिती जाणून घेतली.या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात मोलाची भर पडली.
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांना तांत्रिक शिक्षणाची प्रत्यक्ष माहिती मिळावी, या उद्देशाने या भेटीचे आयोजन करण्यात आले होते.विद्यालयाचे उपक्रमशील,राज्य पुरस्कृत शिक्षक अशोक गिरी यांनी या कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले.त्यांनी विद्यार्थ्यांना प्रदर्शन स्थळी नेऊन तेथील विविध यंत्रे,तांत्रिक प्रकल्प आणि रोजगाराच्या संधींविषयी सविस्तर माहिती दिली.विद्यार्थ्यांनी देखील प्रत्येक दालनाला भेट देऊन अत्यंत उत्साहाने व उस्फूर्तपणे माहिती जाणून घेतली.
सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी विज्ञान शिक्षिका विना जिभकाटे, मानसी ठवकर, सुमय्या शेख,अरुणा कांबळे,अर्चना दडवे तसेच शालेय विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.या अभ्यासपूर्ण भेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये तंत्रज्ञानाविषयी कुतूहल निर्माण झाले असून पालकांनी व शाळा व्यवस्थापनाने या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!