अवैध रेती तस्करी करताना आणखी एक बळी



ताडोबा  बफ्फर झोन मधून रात्र दिवस अवैध रेती तस्करी

तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - वरोरा तालुक्यातील पोलीस स्टेशन शेगाव अंतर्गत मौजा वायगाव जंगल परिसर (ताडोबा बफर) मध्ये  दिनांक  १४ जानेवारी चे रात्री अवैध रेती तस्करी करीत असताना  निखिल चौखे वय 20 वर्षे राहणार वायगाव भोयर हा  ट्रॅक्टर मालक प्रकाश हिवरे राहणार चारगाव याचे सांगनेसवरून ताडोबा बफर झोन परिसरातील गाईच्या घाट, मैशाच्या पाठ मधून अवैध  रेती भरून येत असताना वन विभाग ची गाडी दिसल्याने  पळापळी मधे सर्व मजूर पळून गेले  परंतु ट्रॅक्टर चालक  निखिल चौके यांनी हायड्रोलिक वर केल्यामुळे प्रवीण वसंत दडमल वय 35 वर्ष चारगाव बु. हा  वरून खाली  पडून रेतीखाली दबल्याने मरण पावला. या बाबत  गोपिका वसंता दडमल यांचे फिर्याद वरून शेगाव पोलिसांनी मोक्का पंचनामा करून अप क्रमांक 21/25 कलम 106 (1), 49 भारतीय न्याय संहिता अन्वय गुन्हा नोंद केला व  आरोपी यांना ताब्यात घेऊन ट्रॅक्टर जप्त केलेले  आहे. दरम्यान घटनेचा पुढील तपास psi  सुमित कांबळे, मदन येरमे करीत आहे. 
दरम्यान अशा प्रकारे ताडोबातील बफर झोन वनपरिक्षेत्र कार्यालय खडसंगी अंतर्गत सर्रासपणे अवैध रेती तस्करी मोठ्या प्रमाणत केल्या जात असल्याने याच बेंबळा,वायगाव, निमढेला भागात वाघ, बिबट्या व अन्य जंगली प्राण्यांची मोठ्या प्रमाणत नेहमीच वर्दळ असुन जंगली  वन्य प्राणी मानवी वस्ती कडे धावपळ करीत असतात, दोन दिवसा आधी याच भागात बेंबळा या गावात वाघ शिरला होता परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात तस्करी होत असताना सुद्धा वन विभाग बग्याची भूमिका घेत असल्या कारणांनी वन विभागाच्या काही  अधिकारी व कर्मचारी यांच्यावर वन्य प्राणी सुरक्षित राहनार का?  प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!