अधिकारी जाणून घेणार शेतकऱ्यांच्या समस्या




तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - कृषी विभाग व शेतकरी यांचा वर्षानुवर्षे एकमेकांसी असलेला ऋणानुबंध अधिक घट्ट करण्यासाठी आपल्या कार्यक्षेत्रातील वेगवेगळ्या गावात जाऊन शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, समस्या,अपेक्षा व सूचना इ. गोष्टी जाणून घेऊन विभागाच्या कामामध्ये सुधारणा करण्याच्या सामाजिक हेतूने शेतकऱ्यांशी संवाद साधण्याकरीता महाराष्ट्र राज्याचे कृषी आयुक्त सुरज मांढरे यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या संवाद सेतू  कार्यक्रमाची सुरुवात संपूर्ण राज्यभर सुरू झालेली आहे.
त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत वरोरा तालुक्यात मंडळ कृषी अधिकारी, शेगांव(बु)  विजय काळे यांनी मौजा- मजरा (रै) येथील रेशीम उद्योजक शेतकरी  विजय क्षिरसागर यांच्या शेतावर रेशीम उद्योगात येणाऱ्या समस्या व अडचणी यावर शेतकऱ्यांशी संवाद साधला नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत वैयक्तिक योजना बद्दल माहिती व समाविष्ट गावातील लाभार्थी निवडून त्यांचे प्रत्यक्षात अर्ज महाविस्तार AI अँप वर भरून देण्यात आले.
रेशीम शेती बद्दल तंत्रशुद्ध मार्गदर्शन  माजी जिल्हा रेशीम अधिकारी पंडीत चौगुले,नागपूर यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत केले.त्यांनी तुती लागवड, कीटक संगोपन गृह उभारणी व कोष विक्री बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.मे.कांचणी शेतकरी उत्पादक कंपनी चे संचालक यशवंत सायरे व कार्यक्रम समन्वयक रमेश चौधरी यांनी पोकरा योजने अंतर्गत अनु.जाती,अनु.जमाती यांनी CBDC अंतर्गत लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन केले,व बायोचार निर्मिती,कोष खरेदी-विक्री व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार याबाबत माहिती दिली..
  वरोरा परिसरातील रेशीम शेती करण्यास इच्छुक 20 शेतकरी तसेच उपकृषी अधिकारी  प्रफुल आडकीने, सहाय्यक कृषी अधिकारी माधुरी राजुरकर व समूह सहाय्यक शुभांगी हनवते यावेळी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!