संविधान समितीकडून भव्य केंडल मूक रॅलीद्वारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरात शांतता, संविधान मूल्ये आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारी भव्य केंडल मूक रॅली पाहायला मिळाली. वडाळा (पैकू) चिमूर येथील संविधान सन्मान दिन समारोह समितीच्या वतीने ही रॅली शनिवार ला सायंकाळी मुख्य रस्ताने संविधान चौक येथून निघाली.
कार्यक्रमाची सुरुवात संविधान चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्रासह अशोक स्तंभावर पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर ‘संविधान हा आपल्या आत्म्याचा प्रकाश’ या संदेशाने सजलेल्या शांततामय केंडल रॅलीला प्रारंभ झाला. हातातील मेणबत्त्यांचा तेजोमय प्रकाश, शांततेचा संदेश आणि डॉ. आंबेडकरांच्या कार्याबद्दलची कृतज्ञता या रॅलीतून स्पष्टपणे जाणवत होती.
रॅली संविधान चौकातून सुरू होऊन मुख्य मार्ग, लुंबिनी बुद्ध विहार, हजारे पेट्रोल पंप टी-पॉईंट, बसस्थानक, हुतात्मा स्मारक मार्गे इंदिरा नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये पोहोचली. येथे समितीचे अध्यक्ष सुधाकर पाटील, सचिव महेंद्र लोखंडे, तसेच किशोर नागदेवते, नंदन लोखंडे, चुन्नीलाल कुडवे, पुंडलीक पाटील, बन्सोड यांनी डॉ. आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पचक्र अर्पण करून दीपप्रज्वलन केले.
यानंतर सर्व उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला आदरांजली वाहिली. संवैधानिक मूल्यांची जपणूक आणि सामाजिक समतेचा संदेश घेऊन ही रॅली पुढे सरकताना नागरीकांनी जागोजागी स्वागत केले. या प्रसंगी लुंबिनी नगर, समता नगर, श्रावस्ती नगर, तक्षशिला बुद्ध विहार येथील महिला-पुरुष, युवक-युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रकाशाच्या ओंजळीतून डॉ. बाबासाहेबांना दिलेली ही श्रद्धांजली चिमूरवासीयांच्या भावविश्वाला स्पर्शून गेली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!