दुचाकींची समोरासमोर धडक तीन व्यक्ती गंभीर जखमी
तालूका - प्रतिनिधी (जगदीश पेंदाम)
वरोरा : - चिमूर 353 ई मुख्य मार्गावर शनिवारला दुपारच्या सुमारासs राळेगाव जवळ दुचाकीची समोरासमोर धडक होऊन तिन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडलेली आहे.तालुक्यातील शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या राळेगाव येथे शनिवारला दुपारच्या सुमारास दोन दुचाकी च्या अपघात होऊन तिघेजण गंभीर जखमी झाले यामध्ये राकेश लोणबले वय 34 रा.ताडाळा मुल, नरेश जयदेव मेश्राम वय 48 वर्ष रा.मुक्ती कॉलनी बंगाली कॅम्प चंद्रपूर शेगाव येथील अरुण रामजी कापटे वय 56 वर्ष गाडी क्रमांक.MH 34 CT 0898 तसेच MH 34 CG 7275 या दुचाकीची समोरासमोर धडक होऊन तिघेही गंभीर जखमी झाले,अपघाताची माहिती नागरिकांनी शेगाव पोलीस स्टेशनला दिली असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळ पंचनामा करून तिघांनाही पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय वरोरा या ठिकाणी पाठवले असता तिघेही गंभीर असल्यामुळे वैद्यकीय अधिकारी वरोरा यांनी चंद्रपूर या ठिकाणी पाठवले असता या मधील दोघांची प्रकृती जास्त खराब असल्यामुळे नागपूर येथे पाठवण्यात आले आहे, राकेश चरणदास लोनबले ताडाळा मुल,तसेच शेगाव येथील अरुण रामजी कापटे यांना चंद्रपूर वरून नागपूर येथे रेफर करण्यात आले आहे, या घटनेच्या अधिक तपास शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेंद्रसिंह यादव यांच्या मार्गदर्शनात शेगाव पोलीस करीत आहे, यावेळी घटनास्थळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पाहण्यासाठी गर्दी केली होती.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!