रेती वाहतूक ट्रकच्या धडकेत महिला गंभीर
रेती वाहतूक ट्रकच्या धडकेत महिला गंभीर
सावली :- हरंबा - सावली मार्गात रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रकने दुचाकीस धडक दिल्याने दुचाकीवर मागच्या बाजूस बसलेली महिला गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली असून महिलेवर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहे.
डोनाळा येथील रहिवासी असलेली महिला उर्मिला विठ्ठल नागापुरे ही साखरी येथील आपल्या मुलीला भेटून
दुचाकीवर मागील सीटवर बसून सावलीला निघाली होती. साखरी या शासकीय परवानगी असलेल्या रेती घाटातून रेतीने भरलेला ट्रक क्र. एम. एच. ३२ ए. के. ६०३२ देवटोक जवळ दुचाकीच्या मागून आला मात्र रस्ता खराब असल्याने दुचाकीस जोरदार धडक दिली त्यात महिला ट्रॅकच्या चाकाखाली गेली. त्यात महिलेच्या एका पायाला गंभीर दुखापत झाली असून ग्रामीण रुग्णालय सावली येथून चंद्रपूर येथील एका खाजगी दवाखान्यात उपचार सुरु होते. मात्र प्रकृती गंभीर असल्याने आज नागपूर येथे उपचारासाठी हलविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. अपघातामुळे या मार्गांवर कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी सावलीचे पोलीस निरीक्षक प्रदीप पुल्लूरवार यांनी आपल्या ताप्यासह उपस्थित राहून ट्रक ठाण्यात जमा करून घेतली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!