काम, संघर्ष आणि विश्वास यांची ताकद : प्रभाग १० मध्ये निलेश राय आघाडीवर

प्रस्थापित सत्तेला आव्हान देणारे नेतृत्व : प्रभाग १० मध्ये निलेश राय यांचा दबदबा


मूल शहरातील प्रभाग क्रमांक १० ची निवडणूक ही यावेळी केवळ एक राजकीय लढत न राहता, प्रस्थापित सत्तेला दिलेले खुले आव्हान ठरत आहे. येत्या २० डिसेंबर रोजी होणाऱ्या या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निलेश राय हे नाव सध्या संपूर्ण शहरात केंद्रस्थानी आहे.

संघर्षातून तयार झालेले, तळागाळातील वास्तव जाणणारे आणि जनतेशी थेट नाळ जोडलेले नेतृत्व म्हणून निलेश राय यांची ओळख आहे. कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतानाच विद्यापीठ प्रतिनिधीपदासाठी विद्यार्थ्यांनी बहुमताने त्यांची निवड करून त्यांच्या नेतृत्वगुणांवर शिक्कामोर्तब केला होता. त्या दिवसापासून निलेश राय यांचा प्रवास थांबलेला नाही — तो अधिक धारदार, अधिक प्रभावी होत गेला.

दलितबहुल वार्डातही निलेश राय यांच्यावर समाजाने दाखवलेला विश्वास हा त्यांच्या कार्याची मोठी पावती आहे. त्यांनी आपल्या आई रजनी रायकंटीवार यांना अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आणले. जात, पक्ष, राजकारण यापलीकडे जाऊन जनतेने दाखवलेला हा विश्वास, निलेश राय यांच्या समाजाप्रती असलेल्या निष्ठेचे जिवंत उदाहरण मानले जात आहे.

प्रबोधन, जेसीज, स्नेहबंध यांसारख्या सामाजिक संस्थांमधून त्यांनी सातत्याने सामाजिक काम केले आहे. साई भक्त म्हणून त्यांची श्रद्धा सर्वश्रुत आहे, तर आरोग्य सेवक म्हणून त्यांनी अनेक गरजू रुग्णांचे प्राण वाचवले आहेत. शहरात असा क्वचितच एखादा सामाजिक उपक्रम असेल, जिथे निलेश राय यांची उपस्थिती किंवा योगदान नसेल.

निलेश राय यांच्या वाढत्या लोकप्रियतेने घाबरून, मूल शहरातील जुने, प्रस्थापित आणि तथाकथित मातब्बर नेते पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. मात्र, इतिहास साक्षी आहे — याच नेत्यांना निलेश राय यांनी यापूर्वीही जनतेच्या जोरावर नामोहरम केले होते. आजही परिस्थिती वेगळी नाही, उलट प्रभाग १० मधील माहोल पाहता हे बडे नेते तोंडघशी पडतील, अशी चर्चा उघडपणे सुरू आहे.

सत्ता, पैसा आणि दबावाच्या राजकारणाला न जुमानणारे निलेश राय हे नाव आज सामान्य जनतेचा आवाज बनले आहे. प्रभाग १० मध्ये ही निवडणूक म्हणजे केवळ उमेदवार निवड नव्हे, तर संघर्ष विरुद्ध प्रस्थापित सत्ता यामधील निर्णायक सामना ठरणार आहे.

जनतेच्या विश्वासावर उभे राहिलेले नेतृत्व पुन्हा एकदा इतिहास घडवणार, अशी ठाम भावना प्रभागात व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!