तळोधी बा.ग़्रामपंचायत नालीबांधकामवरील अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करून देण्यांची पत्रकार परिषदेत सतीश देशमुख या ग्रामस्थाची मागणी

तळोधी बा.ग़्रामपंचायत नालीबांधकामवरील अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करून देण्यांची पत्रकार परिषदेत सतीश देशमुख या ग्रामस्थाची मागणी
तळोधी बा - येथील ग़्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या मौजा बाम्हणी‌ वार्ड येथील गैर अर्जदार सरस्वताबाई मारोती मोटघरे व मनोज मारोती मोटघरे यांच्या घर क्रमांक ५९८ असलेल्या रस्तालगत सिंमेट नाली बांधकामावर अतिक्रमण असल्यामुळे या रस्त्यावरुन बैलबंडीने मालाची वाहतूक करताना अडचण निर्माण होत असल्यामुळे सदर रस्त्यावरील असलेल्या नाली बांधकामावरील अतिक्रमण हटविण्यास तळोधी बा. ग़्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामविस्तार अधिकारी वर्गाकडून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप साई मंदीर देवस्थान तळोधी बा. येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सतीश देशमुख यांनी केला आहे. 
       सरस्वताबाई मारोती मोटघरे यांनी घरालगत असलेल्या सिमेंट क्रांक्रीट नाली बांधकामावर पाण्याचा टाका, धुणे धुवाचा गोटा, व किरकोळ सामान ठेवित असल्यामुळे या मार्गावरून बैलबंडीने वाहतूक करतांना अडचण निर्माण होत असल्यामुळे  बैलबंडीचा रस्ता मोकळा‌ करुन देण्यासंबधी ग्रामपंचायत तळोधी बा. दिंनाक ३०/०६/२०२५ ला तक्रार अर्ज केला असता अजुनही ग्रामपंचायतच्या वतीने घटनास्थळी‌ येऊन तक्रार अर्जाचा निपटारा केला गेला नाही. त्यामुळे संबधीत अतिक्रमणाची तक्रार संवर्ग विकास अधिकारी नागभीड यांच्याकडे दिनांक १६/०७/२०२५,मुख्य कार्यकारी अधिकारी, व जिल्हाधिकारी चंद्रपूर व संवर्ग विकास अधिकारी यांच्याकडे दिनांक १४/०८/२०२५ ला अतिक्रमण हटविण्यासंबधी तक्रार केलेली आहे. तसेच ग्रामपंचायत तळोधी बा. १९/०९/२०२५ ला बैलबंडीचा जाण्या येण्याचा मार्ग मोकळा करून अतिक्रमण हटविण्यासंबधात तक्रार अर्ज केलेला असताना मात्र तळोधी बा. ग्रामपंचायत ग्रामविस्तार अधिकारी वर्गाकडून तीन चार दिवसांनी गैर अर्जदार यांनी केलेल्या अतिक्रमणाचा फोटो काढला. मात्र कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई केली गेली नाही. ग्रामपंचायत‌ पदाधिकारी व संबधित अधिकारी वर्गाकडून ग्रामपंचायत  सार्वजनिक नाली बांधकामावरील अतिक्रमण  काढायला सांगितले पाहिजे मात्र तसे कुठलीच ठोस कारवाई केली नसून उलट अतिक्रमण हटविण्यासंबधी विचारणा केली असता आमचा अधिकार नाही असे उलट उत्तर दिले जात असून     महाराष्ट शासन ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या वरिष्ठ अधिकारी वर्गानी संबधित अतिक्रमण हटविण्याकडे लक्ष घालून संबधितावर कारवाई करण्याची मागणी साई मंदीर देवस्थान येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सतिश देशमुख यांनी मागणी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!