उन्हाळी धान पिक हंगामासाठी तळोधी नहराला पाणी उपल्बध करण्यासाठी जनतेचा आक्रोष



तळोधी बा- --घोडाझरी मध्यम प्रकल्प उन्हाळी धान -पिक हंगाम २०२५-२०२६ कालवे समीतीची सभा, जलसंपदा विभाग व कुषी विभागाची संयुक्त सभा गोंविदपूर सिंचाई विभागाच्या आवारात शुक्रवारी पार पडली. या सभेला मार्गदर्शक म्हणून तालुका कुषी अधिकारी पुजारी, कार्यकारी अभियंता जे. एस. सिंग, उपविभागीय अभियंता सिंदेवाही दिलीप मदनकर, शाखा अभियंता‌ राजकुमार वालदे, कालवे निरीक्षक अमोल उघडे, कालवे निरीक्षक चेतन कामडी, कालवे निरीक्षक जे. पी. पेड्डीवारजी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी सिंचाई विभागाच्या वतीने घोडाझरी तलावात सध्या १७.३ फुट पाण्याचा जलसाठा उपलब्ध आहे. उपविभागीय अधिकारी दिलीप मदनकर यांनी उन्हाळी धान पिकासंबधी घोडाझरी तलावातील पाण्यासंबधी सविस्तर माहीती
उपस्थित झालेल्या शेतकरी वर्गाला सांगण्यात आली. मात्र या सभेला घोडाझरी लाभ क्षेत्रातील खरबी, हुमा, मांगरुड, किटाळी, गोंविदपूर, सोनापूर, सोनुली, येनोली, ओवाळा,कोजबी, तळोधी परीसरातील शेकडो शेतकरी उन्हाळी धान पिकांच्या लागवडीसाठी सभेला उपस्थित झालेले होते. यावेळी सदर शेतकरी वर्गाच्या वतीने यावर्षी घोडाझरी तलावात पाण्याचा जलसाठा जास्त प्रमाणात उपलब्ध आहे. गेल्या चार पाच वर्षापासून दरवर्षी घोडाझरी तलावा लगत असलेल्या गावालगत पाणी उपलब्ध करुन दिल्या जाते. त्यामुळे यावर्षी पाण्याचा साठा भरपूर असल्यामूळे तळोधी बा. येथील नवानगर गावालगत असलेल्या ठिकाणापर्यतच्या शेतालगत पाणी उपलब्ध करुन देण्यात यावा यासाठी जनतेच्या वतीने आक्रोष व्यक्त करण्यात आले. दरवर्षी घोडाझरी उन्हाळी धान पिकांच्या संदर्भात मिंटीग मध्ये तळोधीला पुढील वर्षी पाणी उपलब्ध करुन दिल्या जाईल असे सांगितले असताना यावर्षी घोडाझरी कालवे समीतीच्या अधिकारी वर्गाच्या वतीने तळोधीला उन्हाळी धानपिकांच्या हंगामा पासून वगळले जात असल्यामुळे शेतकरी वर्गाच्या वतीने अधिकारी वर्गावर आक्रोष करण्यात आला. संबधित विभागाच्या वतीने शेतकरी वर्गाचा आक्रोष बघून सभा लवकर गुडाळून अधिकारी वर्ग निघून गेल्याने सभेला आलेले शेतकरी वर्ग अधिकारी वर्गाच्या कामगिरी बद्दल नैराश्य व्यक्त केले जात होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!