समग्र शिक्षा कर्मचाऱ्यांचे नागपुरात बेमुदत उपोषण

'कायम करा किंवा स्वेच्छामरण द्

३००० हून अधिक कर्मचारी यशवंत स्टेडियमवर ठोकला मुक्काम

तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - आपल्या सेवेला कायमस्वरूपी मान्यता मिळावी या प्रमुख मागणीसाठी, समग्र शिक्षा संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील ३००० हून अधिक कंत्राटी कर्मचाऱ्यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बेमुदत आमरण उपोषण आणि अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत शासन कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करण्याचा आदेश देत नाही किंवा स्वेच्छामरणाची परवानगी देत नाही, तोपर्यंत यशवंत स्टेडियम, नागपूर येथील आंदोलन सोडणार नाही, असा ठाम निर्धार या आंदोलक कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
३००० कर्मचाऱ्यांचा दिवस-रात्र संघर्ष
गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण विभागात कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेले हे कर्मचारी आपल्या भविष्याच्या अनिश्चिततेमुळे त्रस्त आहेत. आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी हा कठोर निर्णय घेतला आहे. या आंदोलनामध्ये दिवस-रात्र मोठ्या संख्येने कर्मचारी सहभागी असून, त्यांच्यामध्ये तीव्र असंतोष दिसून येत आहे.
भंडारा जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचा सहभाग:-
या आंदोलनात भंडारा जिल्ह्यातील अनेक कर्मचारी सहभागी झाले असून,यामध्ये दिपाली बोरीकर, वैशाली नगराळे,रामरतन भाजीपाले, डॉ.मुरलीधर रेहपाडे,अनिल येले, विवेक बोरकर,प्रमोद सोनवणे, रामकृष्ण वाडीभस्मे,राहुल बडोले आणि मनोज वैद्य यांचा समावेश आहे.हे सर्वजण आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत माघार न घेण्याच्या निर्धारावर ठाम आहेत.
समग्र शिक्षा कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या या बेमुदत आंदोलनामुळे नागपूरमधील राजकीय वातावरण तापले असून,शासनाने तातडीने यावर तोडगा काढावा,अशी मागणी जोर धरू लागली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!