आधारभूत धान खरेदी नोंदणीस मुदतवाढीची मागणी - नोंदणी केंद्र गर्दीने फुलले



सावली (विजय कोरेवार) - 
आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धान उत्पादक शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी १५ डिसेंबर ही शेवटची तारीख आहे मात्र शेतकऱ्यांची संख्या जास्त असतांना नोंदणी केंद्राची कमी संख्या, लिंक फेलची अडचण यामुळे अजूनही अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित आहेत. त्यामुळे नोंदणी प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.
        शासनाने रब्बी हंगामातील धान खरेदी नोंदणीसाठी १५ डिसेंबर पर्यंत मुदत दिली होती. परंतु शेतकरी संख्या जास्त असल्याने व नोंदणी कालावधी कमी असल्याने शेतकऱ्यांना नोंदणी करता आली नाही व हजारो शेतकरी नोंदणीपासून वंचित आहेत.  नोंदणी केंद्राची संख्या कमी असल्याने ४-५ दिवस रांगेत राहिल्यावर नोंदणी होत असे. त्यातच लिंक फेलची अडचण येऊ लागली. सावली येथेआधारभूत केंद्रावर शेवटच्या दिवशीही शेकडो शेतकरी रांगेत आहेत, अर्जाचे गट्टे केंद्रात जमा केले आहेत,  बोनसपासून वंचित राहणार ही भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे शेतकरी बोनसपासून वंचित राहू नये म्हणून नोंदणीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!