पवन विद्यालयात आंतरशालेय क्रीडा महोत्सवाचा शानदार शुभारंभ डॉ.लेपसे यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन




तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - दि.११/अशोक गिरी.
पवनी शिक्षण संस्थेद्वारे संचालित पवन विद्यालय,पवनी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंतर शालेय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन क्रीडा संकुल पवनी येथे मोठ्या उत्साहात पार पडले. माजी प्राचार्य डॉ. विजय लेपसे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले.
या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र आष्टेडू आखाड्याचे अध्यक्ष राजेश तलमले आणि पं.स. पवनीचे कनिष्ठ अभियंता चैतन्य हूलपले उपस्थित होते. तसेच, पवनी शिक्षण संस्थेचे सचिव शब्बीर अली सय्यद, पवन विद्यालयाचे मुख्याध्यापक चक्रधर मेश्राम आणि ज्येष्ठ शिक्षक देवराज बावनकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. क्रिडा शिक्षक राजेश येलसटटीवार, सहाय्यक क्रीडा शिक्षक गजानन जाधव, कोमल धकाते, भूमेश्वरी तेलमासरे, मेहंविश शेख, संगीता बावनकर, रूपाली वैरागडे आणि डोमेश्वर नागपुरे यांच्यासह अनेक शिक्षक व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून महोत्सवाला सुरुवात झाली.
या क्रीडा महोत्सवामध्ये क्रिकेट, कबड्डी, बॅडमिंटन, फुटबॉल, हँडबॉल, धावण्याच्या स्पर्धा, खो खो, गोळा फेक आणि थाळी फेक अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व स्पर्धा क्रीडा संकुल पवनी येथे पार पडणार आहेत.उद्घाटनानंतर उपस्थित पाहुण्यांच्या उपस्थितीत वर्ग ९वा आणि वर्ग १०वा यांच्यात क्रिकेटचा उद्घाटन सामना खेळवण्यात आला, ज्यामुळे स्पर्धेचा उत्साह द्विगुणित झाला. विद्यार्थ्यांमधील क्रीडा गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी संस्थेने उचललेल्या या पावलाचे उपस्थितांनी कौतुक केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!