मारकवार फॅक्टर” सक्रिय! जिल्हा परिषद निवडणुकीत नवा खेळ सुरू

मारकवार घराण्याची जिल्हा परिषदेत दमदार एन्ट्री? रुपेश मारकवार यांचा भाजप उमेदवारीवर दावा चर्चेत
मूल तालुक्याच्या राजकारणात मारकवार घराण्याचे दीर्घकालीन योगदान ओळखले जाते. याच पार्श्वभूमीवर आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत मारकवार घराण्याची एन्ट्री होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सामाजिक कार्यकर्ता रुपेश मारकवार यांनी मारोडा–राजोली जिल्हा परिषद गणातून भाजपाकडून उमेदवारीचा दावा केल्याची माहिती समोर आली आहे.

रुपेश मारकवार यांचे मागील काही वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात सक्रीय योगदान असून विविध सामाजिक उपक्रमांतून त्यांनी भरीव कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा भाजपच्या अंतर्गत वर्तुळात जोर धरू लागली आहे. स्थानिक पातळीवरील नेतृत्व, जनसंपर्क आणि समाजकार्य या गुणांच्या पार्श्वभूमीवर रुपेश मारकवार यांची उमेदवारी मजबूत मानली जात आहे.

मारोडा–राजोली गणातून भाजपकडून ऍड. सागर मुद्दमवार, बंडू नरमलवार आणि गजानन वल्केवार यांच्या नावांचीही जोरदार चर्चा सुरू असताना मारकवार घराण्याच्या एन्ट्रीनंतर उमेदवारीसाठी स्पर्धा अधिक रंगतदार होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

आगामी काळात भाजप पक्षीय बैठका आणि संघटनाची दिशा पाहून अधिकृत उमेदवार निश्चित होणार असून, या निवडणुकीत मारकवार घराण्याचा प्रभाव किती निर्णायक ठरणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

३ टिप्पण्या:

झिंदाबाद!