अतिवृष्टीग्रतांना भरपाई देण्याची नितीन येरोजवार यांची मागणी
मुल तालुक्यात अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवाना कोणतेही निकष न लावता नुकसान भरपाई द्यावी - बल्लारपूर विधानसभा संघटक नितीन येरोजवार यांची मागणी
मुल तालुक्यात अतिवृष्टीमुळे संपूर्ण भात व कापूस पिकाचे प्रचंड नुकसान होऊन सर्व उभी शेती पाण्याखाली येऊन जमीनदोस्त झाली आली आहे या प्राश्वभूमिवर बल्लारपूर विधानसभा संघटन प्रमुख नितीन येरोजवार यांनी संपूर्ण तालुक्याच्या शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली असता शेतकरी बांधवाचे उभे पिक जमीनदोस्त झाले पिकाचे नुकसान होऊन हातात काही येण्याची चिन्हे दिसत नाही गेल्या काही दिवसात खूप प्रमाणात खूप पाऊस आल्यामुळे सर्व पिक उध्वस्त झाले आहे .नवीन धान कापून ठेवण्यात आलेले होते ते पण संपूर्ण पाण्याखाली आलेले आहे तसेच उभे धान जमीनदोस्त झालेले आले तरी प्रशासनाचे लक्ष्य वेधण्यासाठी शिवसेना बल्लारपूर विधानसभा संघटन प्रमुख नितीन येरोजवार यांची नेतृत्वात मुल उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले.अतिवृष्टीमुळे शेतकरी वर्गाचे पिकाचे अतोनात नुकसान झालेले आहे त्यांच्या हातात आलेला घास हिरावला गेला त्यामुळे धान,कापूस उत्पादक शेतकरी बांधवाना सरसकट कोणतेही निकष न लावता नुकसान 50 हजार रुपये हेक्टरी भरपाई द्यावी तसेच सातबारा कोरा करून संपूर्ण कर्जमाफी द्यावी अशी मागणी मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आलेली आले.याप्रसंगी तालुका प्रमुख राज ठाकरे ,शहर प्रमुख बादल करपे ,उपतालुकाप्रमुख रवी शेरकी,सुशी सरपंच अनिल सोनुले,उपतालुकाप्रमुख संदीप निकुरे ,माजी तालुका प्रमुख सुनील काळे, महेश चौधरी,तालुका समन्वयक ओमदेव मोहुर्ले,दिशांत पुण्यापवार शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!