नगर पंचायत सावली येथे घरकुलधारकांना प्रमाणपत्राचे वाटप

 

सावली - प्रधानमंत्री शहरी आवास योजने अंतर्गत घरकुलांचे पूर्ण बांधकाम झालेल्या घरकुल धारकांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आलें. नगरध्यक्षा साधनाताई ईश्वर वाढई यांच्या हस्तेप्रमाणपत्राचे वाटप करण्यात आलें. 

        प्रधानमंत्री शहरी आवास योजनेनंतर्गत सावली शहरात घरकुल मंजूर झाले. शहरातील घरकुल धारकांना लोकलेखा समितीचे अध्यक्ष तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वड्डेटीवार यांच्या पुढाकाराने वेळोवेळी निधीचे वितरण करण्यात आले. अनेकांचे घरकुल बांधकाम पूर्ण झाल्याने लाभार्थ्यांना २ लक्ष ४० हजार रुपये अनुदान वाटप करण्यात आले. त्या लाभार्थ्यांना नगराध्यक्षा साधना वाढई यांच्या हस्ते घरकुलधारकांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी संदिप रोडे, सभापती सचिन संगिडवार, सभापती अंजली देवगडे, नगरसेवक प्रितम गेडाम, नगरसेवक गुणवंत सुरमवार व सतीश बोमावार व घरकुल धारक उपस्थित होते. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!