विहिरीत उडी घेत शेतकऱ्याची आत्महत्या

३ दिवसातच शेगाव मधील आणखी एका शेतकऱ्याची आत्महत्या

तालुक्यातील शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत तीन दिवसात दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - सध्या सततच्या नापिकीमुळे आणि शेतमालाला  न मिळणाऱ्या शेतमाल भावामुळे शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात आर्थिक संकट ओडवले आहेत.  त्यातच शेतमालाला हमीभाव सुद्धा मिळत नसल्याकारणाने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना राज्य शासनाने निवडणूक पूर्वी केलेल्या घोषणा शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी अद्यापही केलेली नाही त्यामुळे देशोधडीला  लागलेल्या व कर्ज मध्ये बुडालेल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या हाच एकच पर्याय निवडलेला आहे.यातच कर्जबाजारीपणामुळे वरोरा तालुक्यातील शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत गेल्या तीन दिवसात तीन आत्महत्या झाल्या असून त्या मध्ये दोन शेतकऱ्यांचा समावेश आहे. 
तीन दिवसा अगोदर नामदेव कडूजी गायकवाड रा. शेगाव (खुर्द) वय वर्ष ६५  वर्ष यांनी सततच्या नापिकी व कर्जबाजारीपणामुळे शेतामध्ये आंब्याच्या झाडाला गळफास घेत  आत्महत्या केली होती. ही घटना ताजी असतानाच आज दिनांक १  सप्टेंबर २०२५  ला शेगाव येथील  शेतकरी राजू तुळशीराम देवतळे वय वर्षे ४४ यांनी सुद्धा विहिरीमध्ये उडी घेत जीवन यात्रा संपवलेली आहे. राजू देवतळे हा प्राप्त माहिती नुसार कॅन्सर या आजाराने ग्रस्त होता व घरची परिस्थिती हे नाजूक असून शेतीमध्ये सुद्धा उत्पन्न होत नसल्याकारणाने व कर्जात बुडाले असल्याकारणाने त्यांनी सुद्धा जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला असावा. तीन दिवसात शेतकऱ्यांच्या अशा झालेल्या दोन आत्महत्या मुळे परिसरात मात्र हळहळ व्यक्त होत आहे. तरीसुद्धा मायबाप सरकारला शेतकऱ्यांविषयी घाम फुटत नाही हेच नवल आहे. तसेच दोन दिवसाआधी शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गतच येणाऱ्या किन्हाळा या गावातील १७ वर्षीय बारावी मध्ये शिक्षण घेत असलेला विद्यार्थी समीर दयाराम बुरडकर यांनी सुद्धा स्वतःच्या घरी गळफास घेत जीवन यात्रा संपलेली होती. दरम्यान आज विहिरीत उडी घेऊन जीवन यंत्र जीवन यात्रा संपवलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह शेगाव पोलीस  यांनी मोक्का पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे पाठवलेला आहे व तीनही घटनेच्या तपास शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेंद्रसिंग यादव यांच्या मार्गदर्शनात शेगाव पोलीस करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!