जांभुळघाट ग्राम पंचायत येथील महीला सरपंचानी दिला पदाचा राजीनामा

तालूका - प्रतीनीधी ( केवलसिंग जुनी )

चिमुर : - चिमूर तालूक्यातील मौजा जांभुळघाट ग्राम पंचायत येथील महीला सरपंच रंजनाताई खेडकर यांनी दिनांक. १८/८/२०२५ ला  बि.डि.ओ. यांना आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे जांभुळघाट च्या नागरीकांमध्ये आश्चर्य पाहायला मिळत आहे.काही दिवसातच ग्राम पंचायत च्या सरपंच पदाचा कालावधी संपणार असताना अचानक राजीनामा देण्याचे कारण नेमके कोणते याची चर्चा गावातील नागरीकांमध्ये होत आहे.  काही दिवसा पासुन काही ग्राम पंचायत सदस्या बरोबर मतभेत होत असल्याचीही चर्चा नागरीका कडून होताना पाहायला मिळत आहे. कामाचा निधी,ग्रा.पं. कामाचे नियोजन व इतर प्रकाराचे निधी वाटपा बद्दल नियोजना मध्ये सरपंच व काही सदस्य यांचे बरोबर नियमित समस्या पाहायला मिळत असल्यामुळे सरपंच पदाचा राजीनामा देण्यात आल्याची चर्चा गावाकऱ्यांकडून केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!