अज्ञात आजाराच्या रुग्णांमध्ये ग्रामीण भागामध्ये वाढ

ग्रामपंचायतच्या निष्काळजीपणामुळे ग्रामीण भागात घाणीचे साम्राज्य

तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साथीच्या आजारामध्ये ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असून नागरिकांना सर्दी, ताप,खोकला,अंगदुखी,डोके दुखणे, आदी रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.
तालुक्यातील  ग्रामीण भागातील जनतेला उपचार करीता सावरी तसेच, शेगाव, येथे जावे लागत असून आरोग्य उपचार करीता आजही ग्रामीण भागात पुरेपूर शासनाच्या सुविधा अपुऱ्या पडत आहे सगळीकडे शेतीच्या हंगाम सुरू असून पैशा अभावी ग्रामीण भागातील शेतकरी,शेतमजूर, शालेय विद्यार्थी, गरोदर माता, इतर नागरिक उपचाराकरीता सावरी, शेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उपयोग करत असतात ग्रामीण परिसरात मोठ्या प्रमाणात ताप, हातपाय, डोके दुखणे,सर्दी,खोकला यांचे प्रमाण वाढले असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रुग्णांना योग्य औषधी व उपचार मिळत असते तरी रक्त तपासणीचे रिपोर्ट तात्काळ उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना खाजगी महाग रक्त तपासणी पॅथॉलॉजी कडे धाव घ्यावे लागत आहे.
मागील पंधरा दिवसापासून खेड्यापाड्यात घरोघरी वेगवेगळ्या आजाराने लहान, मुले , मुली, महिला,पुरुष, तापाने असून वाँयरल आजारावर वेळीच आळा घालण्याचा दृष्टीने शासकीय आरोग्य यंत्रणा कमी पडत नाही ना असा प्रश्न जनतेच्या मनात उद्भवत आहे, एकीकडे ग्रामीण परिसरात जनतेच्या  फायदा घेत बोगस डॉक्टरांनी मोठ्या प्रमाणात शिरकाव करून ग्रामीण भागात उपचार करतांना दिसत आहे.

सावरी,शेगाव,आरोग्य केंद्रात शेतकरी,शेतमजूर,विद्यार्थी लहान मुले,मुली, महिला,पुरुष, प्राथमिक आरोग्य केंद्रात येत असुन ओ, पी, डी, मध्ये दोनशे ते तिनशे वर वेगवेगळ्या आजाराची रुग्ण मिळत आहे.
शेगाव परिसरातील अनेक गावात घाणीचे साम्राज्य पसरले असून एकीकडे प्रशासनाकडून स्वच्छते करीता ग्रामपंचायतला दरवर्षी येणारा निधी कुठल्या तिजोरीत जात आहे असा सुद्धा प्रश्न जनतेला पडलेला आहे  तालुक्यातील अनेक गावात ठिकठिकाणी नाली उपसा न केल्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरलेली आहे, पावसाळ्यात अनेक ठिकाणी दूषित पाणी, साचलेले असून पिण्याचे पाणी  असलेल्या ठिकाणी येते मोठ्या प्रमाणात कचरा,गावातील मच्छर जनतेच्या आरोग्यासाठी घातक ठरत आहे त्यामुळे पंचायत समिती आरोग्य विभागांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकाकडून करण्यात आलेली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!