जिवंत विद्युत तारेच्या स्पर्शाने एक बैल ठार, एक जखमी
चारगाव खुर्द येथील घटना
तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
वरोरा : - वरोरा तालुक्यात येत असलेल्या चारगाव खुर्द येथील शेतकरी शांताराम विठ्ठल
तितरे यांच्या शेतात पडून असलेल्या जिवंत विद्युत तारेच्या स्पर्शाने एक बैल ठार, एक बैल जखमी तसेच बारमाही काम करणारा शेतमजूर रमेश वाढई जिवंत विद्युत तारेच्या स्पर्शाने जखमी झाल्याची घटना घडलेली आहे.
शेगाव महावितरण यांनी अनेक दिवसापासून शेतामध्ये असलेल्या विद्युत तारेची दुरुस्ती न केल्यामुळे पावसाळ्या दिवसांमध्ये ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात नेहमीच विद्युत तारा पडत असतात चारगाव खुर्द येथील शांताराम तितरे यांची यांची शेती इरई नाला परिसरात असून त्यांच्या शेतामध्ये जिवंत विद्युत तारा पडल्यामुळे नेहमीप्रमाणे सकाळी दहाच्या सुमारास शेतात बैल चारासाठी नेत असताना पळून असलेल्या जिवंत विद्युत तारेला स्पर्श होऊन तितरे यांचा एक बैल जागीच ठार, एक बिल जखमी झाला तसेच रमेश वाढई हा सुद्धा जखमी झाला असुन घटनेची माहिती शेगाव महावितरणचे सहाय्यक अभियंता संतोष खोब्रागडे, शेगाव पोलीस स्टेशन कर्मचारी तसेच पशुवैद्यकीय अधिकारी यांना देण्यात आली, घटनास्थळ पंचनामा केला असून यामध्ये मात्र शेतकरी यांचे जवळपास एक लाखाचे नुकसान झालेले आहे घटनेमध्ये जखमी झालेला बैल तसेच शेतमजूर यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी गावातील नागरिकाकडून यावेळी करण्यात आलेली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!