चिंधी(माल) येथे युवकाचा तलावात बुडून मृत्यु.
यश कायरकर, तालुका प्रतिनिधी:
नागभीड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चिंधी (माल) या गावातील युवक महेश अभीमन सलामे, वय २९ वर्षे याचा गावातीलच एका तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली.
सविस्तर माहितीच्या आधारे असे की महेश सलामे या युवकाला मिर्गी येण्याचा आजार होता. आणि हा युवक शौचास गेल्यानंतर त्याचा तलावामध्ये फक्त अर्धा फूट पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना आज उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच नागभीड पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून विच्छेदनाकरिता नागभीड ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आले. समोरील तपास नागभीड पोलीस करीत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!