अबब! चक्क एटीएम मधून निघाल्या फाटक्या नोटा

नेरी येथील बँक ऑफ इंडिया शाखेच्या एटीएम मधील प्रकार

५०० च्या १८ नोटा निघाल्या फाटक्या, ग्राहकाची कारवाईची मागणी

नेरी - प्रतिनिधी ( शुभम बारसागडे )

नेरी : - चिमूर तालुक्यात नेरी येथे एकमात्र शासकीय बँक ऑफ इंडिया ची शाखा असून, याच बँकेत लाखो ग्राहकांची खाते आहेत. आर्थिक व्यवहार करताना बँकेचा त्रास कमी व्हावा आणि ग्राहकांना सोयीचे व्हावे यासाठी बँक ऑफ इंडिया शाखेचे एटीएम सुरू करण्यात आले. हजारो खातेदार या एटीएम मधून रक्कम काढण्याचे व्यवहार करतात मात्र, दिनांक. १८ ऑगस्टला एका ग्राहकाने एटीएम मधून रक्कम काढली असता चक्क एटीएम मधून ५०० रुपयांच्या १८ नोटा फाटक्या निघाल्या आणि सदर बाब लोकांना सांगताच एकच खळबळ उडाली. नेरी जवळील सिरपूर येथील शंकर जाधव नामक व्यक्ती बँक ऑफ इंडिया शाखेतील स्वतःच्या खात्यातील रक्कम काढण्यासाठी गेले असता तात्काळ रक्कम मिळावी म्हणून बँकेचे एटीएम गाठून, १० हजार रुपयांची रक्कम काढली मात्र, त्यातील ५०० रुपयांच्या १८ नोटा फाटक्या निघाल्या.बँक शाखा व्यवस्थापकडॆ फाटलेल्या नोटा दाखविताच व्यवस्थापकांनी सदर नोटा बदलवून दिल्या मात्र यात संपूर्ण दिवस गेल्याने ग्राहकाचा मनस्ताप झाला. त्यामुळे अखिल भारतीय ग्राहक मंडळ नेरी यांच्याकडे तक्रार करून, दोषींवर कारवाईची करावी अशी मागणी ग्राहकाने केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!