जांभुळघाट येथील मोबाईल टॉवर च्या खडयामुळे लहान मुलांना व जनावरांच्या जीवास धोका
ग्राम पंचायत जागा देऊन झाले मोकाट
तालूका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
चिमुर : - चिमूर तालूक्यातील मौजा जांभुळघाट येथील वार्ड क्रमांक १ मध्ये मोबाइल टॉवर कंपनीचा मागील दोन महीण्या पासुन काम सुरू आहे.टॉवर कंपनी कडून मोठ - मोठे खड्डे खोदले असुन आता हे खड्डे पुर्ण पाण्याने भरून आहे.या खड्डे सभोवताल कोणत्याही प्रकारची सेफ्टी नसल्याने लहान मुले व जणावराच्या जीवाला धोका होऊ शकतो अश्या प्रकारची जांभुळघाट येथील नागरीकांमध्ये चर्चा होत आहे.याकडे तहसिलदारानी लक्ष देऊन टॉवर कंपनीवर कार्यवाही करण्यात यावी.अश्या प्रकारची गाव वासीयां कडून मागणी होत आहे.
दुसरीकडे जांभुळघाट ग्राम पंचायत ने राखीव असलेल्या प्लॉट ला टॉवर कंपलीला किरायाने देऊन मोकाट झाल्याने नागरीका मध्ये नाराजगी पाहायला मिळत आहे.हे प्लॉट समोरच्या कोणत्याही शासकिय किंवा ग्राम पंचायतच्या इमारती व इतर बांधकामासाठी राखीव ठेवले असता टॉवर कंपनीला देऊन कोणता विकास ग्राम पंचायत करणार आहे अश्या प्रकार चर्चा नागरीका मध्ये होताना दिसत आहे.
जसा एका बार ची येनोसीची परवाणगी ग्राम पंचायत द्वारे देण्यात आली पण इतर बार किंवा बिअर शॉपला एन. ओ. सी परवाणगी देण्यास ग्राम पंचायत नकार देण्याचे कारण कोणते..? हे प्रकार भेदभाव आहे की इतर प्रकार आहे तर नाही ना..? आता तर अवैध दारू बंद करण्यासाठी उप सरपंचानी दिले भिसी पोलीस स्टेशनला तक्रार अश्या प्रकार अजब-गजब प्रकार ग्राम पंचायत मध्ये होत असल्याची नागरीकात चर्चा होताना पाहायला मिळत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!